कोलकाता, आयपीएल : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे कोलकाताचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. या पराभवाचे खापर आता या सामन्यात कोलकाताकडून दुसरी सर्वाधिक धावसंख्या उभारणाऱ्या रॉबिन उथप्पावर पडताना दिसत आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात कोलकाताची सुरुवात चांगली झाली. ख्रिस लिनने संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. पण लिन बाद झाल्यावर मात्र कोलकाताचा डाव गडगडला. त्यावेळी कोलकत्याच्या संघाला सावरले ते उथप्पाने. उथप्पाने या सामन्यात 40 धावा केल्या, त्यामुळेच कोलकाताच्या संघाला 133 धावा करता आल्या.
या सामन्यात ख्रिस लिनने सर्वाधिक 41 धावा केल्या. लिनने या 41 धावा 29 चेंडूंत केल्या. दुसरीकडे उथप्पाला 40 धावा करताना 47 चेंडू खेळावे लागले. या 47 धावांमध्ये उथप्पाला 26 चेंडूंमध्ये एकही धाव करता आली नाही. त्यामुळे या सामन्यात कोलकाताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. जर या 24 धावांमध्ये 24 धावा जरी करता आल्या असल्या तरी कोलकाताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला असता. त्यामुळे कोलकाताच्या पराभवासाठी उथप्पाला चाहते दोषी मानत असल्याचे पाहायला मिळत आहे.'
कोलाकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवत मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता मुंबईचा पहिल्या क्वालिफायरमध्ये सामना होणार आहे तो चेन्नई सुपर किंग्सबरोबर. मुंबईने या सामन्यात कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले. कोलकाता पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे. हैदराबादला आता दिल्ली कॅपिटल्सचा सामना एलिमिनेटरमध्ये करावा लागणार आहे.
ख्रिस लीनने 29 चेंडूंत 41 धावा करताना कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. त्याने शुबमन गिलच्या सोबतीनं पहिल्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. पण, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कोलकाताला धक्के देण्याचे सत्र सुरु केले. लसिथ मलिंगाने कोलकाताचा हुकुमी एक्का आंद्रे रसेलला भोपळाही फोडू दिला नाही. त्याने कोलकाताचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले आणि त्यामुळे पाहुण्यांना 7 बाद 133 धावांपर्यंतच मजल मारता आली. रॉबीन उथप्पाने 47 चेंडूंत 40 धावा केल्या.
Web Title: IPL 2019: Robin Uthappa plays 24 dots balls in KKR vs MI match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.