मुंबई : रणवीर सिंगचा गली बॉय हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्या चित्रपटातील गाणी तर भलतीच हिट झाली आहेत. त्यात रणवीर सिंगने साकारलेले कॅरेक्टर हे लोकांना फारच भावले. रणवीरच्या या गली बॉयच्या चाहत्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही सहभागी झाला आहे आणि त्यानं चक्क मुली समायरासाठी रॅप साँग गायले. सोशल मीडियावर रोहितचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचं नाव समायरा असं ठेवलं . काही दिवसांपूर्वई या शर्मा दाम्पत्याची मान अभिमानानं उचावली आणि त्याला कारण त्यांची तीन महिन्यांची समायरा ठरली आहे. ओल पेजेटा या वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेनं समायराचा गौरव केला आहे. केनियातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या मादी गेंड्याला समायराचे नाव देण्यात आले आहे. दोन महिनेच्या कन्येचा झालेला हा गौरव पाहून बापमाणूस रोहितचे डोळे पाणावले आणि त्याने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रोहितला मुलीला अधिकाधिक वेळ देण्याची संधी मिळत आहे आणि हिटमॅन त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे. तो शक्य तितका वेळ समायराला देत आहे आणि सोशल मीडियावर या बाप लेकीच्या आठवणी शेअर करत आहे. शनिवारी रोहितनं समायरा सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यात चक्क रोहित समायरासाठी रॅप साँग गाताना दिसत आहे. बापमाणूस रोहितनं केलेला हा प्रयत्न नेटिझन्सनाही चांगलाच आवडला आहे. अवघ्या तीन तासांत त्या व्हिडीओला 30 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान रोहितला कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यानंतर तो मायदेशी परतला आणि त्यामुळे त्याला सिडनी कसोटीत खेळता आले नव्हते. त्यानंतर वन डे मालिकेसाठी तो आठवडाभरात पुन्हा ऑस्ट्रेलियात परतला. त्यानंतर जवळपास महिनाभर तो मुलीपासून दूर होता. त्यानंतर मायदेशात परतताच रोहितने मुलीसोबत वेळ घालवला. पण, त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला सुरुवात झाली होती.
Web Title: IPL 2019: Rohit sharma became 'Gully Boy'; song Rap song for little girl samaira
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.