मुंबई : विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडू असला तरी त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूला एकदाही इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल 2019) जेतेपद पटकावता आलेले नाही. पण, आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून कोहली यंदा आयपीएलमध्येही धमाका करण्यासाठी सज्ज आहे. एबी डिव्हिलियर्स आणि सिमरोन हेटमेयर ही जोडी कोहलीसह फटकेबाजी करण्यासाठी आतुर आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूला सलामीच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावा लागणार आहे.
रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई28 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू31 मार्च : सनराइझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हैदराबाद2 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चैलेंजर्स बंगळुरू, जयपूर5 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू7 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू13 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मोहाली15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई19 एप्रिल : कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता21 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू24 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब, बंगळुरू28 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली30 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू4 मे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइझर्स हैदराबाद, बंगळुरू
रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरूचा संघ विराट कोहली, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, नॅथन कोल्टर-नायल, मोईन अली, मोहम्मद सिराज, कॉलीन डी ग्रॅंडहोम, टीम साऊदी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलवंत खेज्रोलिया, मार्कस स्टॉयनिस, सिमरॉन हेटमायर, गुरकीरत सिंह, हेन्रीक क्लासेन, देवदूत पडिक्कल, शिवम दुबे, आकाशदीप नाथ, हिम्मत सिंह, मिलिंद कुमार, प्रयास राय बर्मन.