IPL 2019: रवींद्र जडेजाचा 'हा' षटकार पाहताना खुर्चीवर नीट बसा बरं!

शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजानं हाणलेला षटकार सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:52 PM2019-04-12T12:52:53+5:302019-04-12T12:57:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019, RR Vs CSK: Ravindra Jadeja Hits Craziest Six in last over of ben stokes | IPL 2019: रवींद्र जडेजाचा 'हा' षटकार पाहताना खुर्चीवर नीट बसा बरं!

IPL 2019: रवींद्र जडेजाचा 'हा' षटकार पाहताना खुर्चीवर नीट बसा बरं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देराजस्थानच्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी १८ धावांची गरज होती. याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजानं हाणलेला षटकारही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.चेन्नईला उरलेल्या चार चेंडूमध्ये आठ धावा करायच्या असतानाच स्टोक्सनं धोनीला बाद केलं.

आयपीएल २०१९ : चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यातील शेवटचं षटक भलतंच गाजतंय. 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीनं रागारागात मैदानात शिरून पंचांशी हुज्जत घातल्यानं ही ओव्हर चर्चेत आहेच, पण याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजानं हाणलेला षटकारही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आम्हीही हा षटकार तुम्हाला दाखवतो, पण त्याआधी थोडं सावरून, खुर्ची घट्ट धरू बसा. कारण, हा षटकार मारताना स्वतः जडेजा खाली पडला, गोलंदाज बेन स्टोक्सही आपटला. त्यामुळे आपली काळजी आपणच घेतलेली बरी, नाही का?

राजस्थानच्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी १८ धावांची गरज होती. मैदानावर 'सर' जडेजा आणि 'कूल' धोनी असल्यानं ते कठीण नव्हतं. अर्थात, राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं चेंडू बेन स्टोक्सच्या हाती सोपवल्यानं ते सोपंही नव्हतं. परंतु, जडेजानं या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला. हा फटका खेळताना तो क्रीझमध्येच आडवा झाला. त्याचवेळी, चेंडू टाकल्यानंतर फॉलो थ्रूमध्ये स्टोक्सचाही तोल गेला. तशातही, जडेजानं हवेत मारलेला चेंडू सीमारेषा पार करतो की फिल्डरच्या हातात विसावतो, हे पाहण्यासाठी स्टोक्सनं पडल्या-पडल्याच गिरकी घेतली. हे दृश्य पाहून समालोचकही खो-खो हसत होते. 

पहिल्याच चेंडूवर उडवलेल्या या षटकारानं राजस्थानच्या हातून विजयाचा घास हिरावूनच घेतला. कारण पुढच्या चेंडूवर नो बॉलमुळे दोन धावा चेन्नईला मिळाल्या. त्याच्या पुढच्या चेंडूवर धोनीनं दोन धावा घेतल्या. म्हणजेच, दोनच चेंडूत दहा धावा झाल्या. चेन्नईला उरलेल्या चार चेंडूमध्ये आठ धावा करायच्या असतानाच स्टोक्सनं धोनीला बाद केलं. त्यामुळे चेन्नईचे चाहते अस्वस्थ झाले. पण, मिशेल सँटनरनं अत्यंत संयमानं दोन चेंडूंवर दोन - दोन धावा घेतल्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत चेन्नईला धोनी स्टाईल विजय मिळवून दिला. 


चेन्नईचा संघ ४ बाद २४ अशा कठीण परिस्थितीत असताना, अंबाती रायुडू (४७ चेंडूत ५७ धावा) आणि धोनीनं (४३ चेंडूत ५८ धावा) डाव सावरला. या खेळीसाठी धोनी 'मॅन ऑफ द मॅच' ठरला. 

Web Title: IPL 2019, RR Vs CSK: Ravindra Jadeja Hits Craziest Six in last over of ben stokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.