22 Apr, 19 11:36 PM
पंतच्या नाबाद 78 धावा; दिल्ली सहा विकेट्सनी विजयी
22 Apr, 19 11:32 PM
19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंतचा षटकार; शेवटच्या षटकात सहा धावांची आवश्यकता
22 Apr, 19 11:28 PM
रदरफोर्ड माघारी; धवल कुलकर्णीला यश
22 Apr, 19 11:20 PM
दिल्लीला तिसरा धक्का; पृथ्वी शॉ बाद
22 Apr, 19 11:17 PM
ऋषभ पंतची दमदार फलंदाजी; 30 चेंडूत 60 धावा
22 Apr, 19 11:00 PM
या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
22 Apr, 19 10:59 PM
पृथ्वी आणि पंत या जोडीनं राजस्थानच्या गोलंदाजांचा सामना करताना दिल्लीला विजयाच्या दिशेने कूच करून दिली.
22 Apr, 19 10:50 PM
श्रेयस अय्यरही (4) रियान परागच्या गोलंदाजीवर बाद झाला. आयपीएलमध्ये विकेट घेणारा तो दुसरा युवा गोलंदाज ठरला. दिल्लीच्या 10 षटकांत 2 बाद 81 धावा झाल्या होत्या.मुजीब उर रहमानने 17 वर्ष व 11 दिवसांचा असताना आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतली होती. पराग 17 वर्ष व 163 दिवसांचा आहे. या विक्रमात पी सांगवान ( 17 वर्ष व 181 दिवस) आणि वॉशिंग्टन सुंदर ( 17 वर्ष व 201 दिवस) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. दिल्लीने 11.3 षटकातं शतकी पल्ला गाठला.
22 Apr, 19 10:38 PM
आयपीएलमधील रियानची ही पहिलीच विकेट ठरली
22 Apr, 19 10:36 PM
दिल्लीकडून सर्वात दुसरे जलद अर्धशतक ठरले. या विक्रमात रिषभ पंत ( 18 चेंडू) आघाडीवर आहे.
22 Apr, 19 10:32 PM
22 Apr, 19 10:31 PM
धवनने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण, 54 धावांवर तो बाद झाला. श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने धवनला यष्टिचीत केले. धवनने 27 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा केल्या.
22 Apr, 19 10:23 PM
22 Apr, 19 10:22 PM
सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वीने उडवलेला चेंडू टिपण्यात अॅश्टन टर्नरला अपयश आले. 10 धावांवर असताना पृथ्वीला जीवदान मिळाले. धवन आणि पृथ्वी यांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि यंदाच्या मोसमातील सलामीवीरांनी नोंदवलेली ही पहिलीच अर्धशतकी भागीदारी ठरली.
22 Apr, 19 10:16 PM
प्रत्युत्तरात दिल्लीनं सावध सुरुवात केली. राजस्थानचा कर्णधार स्मिथने पहिल्या पाच षटकांत पाच खेळाडूंकडून गोलंदाजी करून घेतली. मात्र, शिखर धवनने दमदार फटकेबाजी केली. दुसरीकडे पृथ्वी शॉ संयमी खेळ करत होता. धवनने संघाच्या धावांचा वेग दहाच्या सरासरीने सुरू ठेवला.
22 Apr, 19 09:36 PM
टर्नरने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये नकोसा विक्रम नावावर केला. त्याने सलग पाच डावांत शून्यावर बाद होण्याचा विक्रम केला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यानंतर रहाणेने अखेरपर्यंत खिंड लढवत संघाला मोठा पल्ला गाठून दिला.
22 Apr, 19 09:32 PM
22 Apr, 19 09:27 PM
22 Apr, 19 09:19 PM
स्मिथ बाद झाल्यानंतरही रहाणेची बॅट थांबण्याचे नाव घेत नव्हती. त्याने दिल्लीच्या गोलंदाजांवर प्रहार सुरूच ठेवला. दुसऱ्या बाजूनं बेन स्टोक्स सावध खेळ करत होता. त्याला 8 धावांवर ख्रिस मॉरिसने बाद केले.
22 Apr, 19 09:15 PM
स्मिथ व रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. राजस्थान रॉयल्सकडून ही चौथी सर्वोत्तम भागीदारी आहे. रहाणे आणि शेन वॉटसन यांनी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 144 धावांची भागीदारी केली होती.
22 Apr, 19 08:54 PM
. या दोघांनी 59 चेंडूंत 100 धावांची भागीदारी केली. जयपूरच्या मैदानावरील ही राजस्थानकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही कोणत्याही विकेटसाठी झालेली ही मोठी भागीदारी आहे.
22 Apr, 19 08:52 PM
22 Apr, 19 08:50 PM
रहाणेच्या जोडीला स्मिथनेही मुक्तपणे फटकेबाजी करण्याचा आस्वाद लुटला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना संघाला 10च्या सरासरीनं धावा करून दिल्या.
22 Apr, 19 08:37 PM
राजस्थानने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 52 धावा केल्या. रहाणेने 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. राजस्थानकडून सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये रहाणेने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या क्रमवारीत जोस बटरल आघाडीवर आहे. त्याने 29 चेंडूंत मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्याविरुद्ध ही खेळी केली.
22 Apr, 19 08:21 PM
अजिंक्य रहाणेला जीवदान
रहाणे आणि स्टीव्हन स्मिथने राजस्थानचा डाव सावरला. पाचव्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर शॉर्ट फाईन लेगला इशांत शर्माने रहाणेचा झेल सोडला. त्यानंतर रहाणेने खणखणीत षटकार व चौकार खेचला.
22 Apr, 19 08:13 PM
22 Apr, 19 08:08 PM
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि दुसऱ्याच षटकात यजमानांना धक्का बसला. अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांच्यात ताळमेळ न राहिल्याने राजस्थानला सुरुवातीलाच धक्का बसला. सॅमसन ( 0) धावबाद होऊन माघारी परतला.
22 Apr, 19 07:42 PM
22 Apr, 19 07:40 PM
राजस्थाना रॉयल्सः अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, रियान पराग, अॅश्टन टर्नर, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाळ, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी
22 Apr, 19 07:39 PM
दिल्ली कॅपिटल्सः पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कॉलीन इंग्राम, ख्रिस मॉरिस, श्रेर्फान रुथरफोर्ड, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, इशांत शर्मा.
22 Apr, 19 07:34 PM
22 Apr, 19 07:23 PM
मुंबई इंडियन्सचा पुढाकार
22 Apr, 19 07:20 PM
चेन्नईने अंतिम सामन्याचा मान गमावला... जाणून घ्या कारण