21 Apr, 19 07:21 PM
IPL 2019 SRH vsKKR : कोलकाताचीपराभवाची'पंचमी', वॉर्नर-बेअरस्टोजोडीनंधुधुधुतलेhttps://t.co/qqS7JEZrOl@SunRisers@KKRiders@IPL#SRHvKKR
21 Apr, 19 07:00 PM
पराभव डोळ्यासमोर दिसताना कोलकाताच्या क्षेत्ररक्षकांनी ढिसाळ कामगिरी केली. त्यांनी दोन सोपे झेल सोडले. परंतु अखेरीस 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी राजने वॉर्नरचा त्रिफळा उडवला. वॉर्नरने 38 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून 67 धावा केल्या.
21 Apr, 19 06:52 PM
IPL 2019 SRH vsKKR : वॉर्नर-बेअरस्टोचीजोडीजमली, तीनवर्षांपूर्वीचाविक्रममोडलाhttps://t.co/Lu2EOAjYw3@SunRisers@KKRiders@davidwarner31@jbairstow21#SRHvKKR@IPL
21 Apr, 19 06:44 PM
या जोडीने शतकी भागीदारी करताना आयपीएलमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमधील या दोघांची ही चौथी शतकी भागीदारी आहे.
21 Apr, 19 06:43 PM
21 Apr, 19 06:31 PM
21 Apr, 19 06:31 PM
प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच 72 धाव चोपून काढल्या.
21 Apr, 19 06:04 PM
आंद्रे रसेलने केली ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी
IPL 2019 : दोनषटकारतरीहीआंद्रेरसेलचाविक्रम, गेलच्या8 वर्षांपूर्वीच्याविक्रमालाधोकाhttps://t.co/Nqo6txwKjv@KKRiders@SunRisers@IPL#AndreRussell#SRHvKKR
21 Apr, 19 05:51 PM
21 Apr, 19 05:48 PM
21 Apr, 19 05:39 PM
21 Apr, 19 05:38 PM
आंद्रे रसेलने 19व्या षटकात कॅरेबीयन स्टाईल फटकेबाजी करताना कोलकाताला समाधानकारक पल्ला गाठून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुवनेश्वरने त्याला बाद केले. भुवनेश्वरला दोन षटकार खेचल्यानंतर रसेलने आणखी एक चेंडू हवेत टोलावला, परंतु यावेळी त्याला सीमा रेषा ओलांडता आली नाही. रशीद खानने त्याचा झेल टिपला. रसेल 9 चेंडूंत 2 षटकारांसह 15 धावा केल्या.
21 Apr, 19 05:30 PM
लीनने 45 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढच्याच चेंडूवर हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने अप्रतिम झेल टिपत त्याला माघारी पाठवले. खलीलने सामन्यातील तिसरी विकेट घेतली. लीनच्या 51 धावांच्या खेळीत 4 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
21 Apr, 19 05:22 PM
21 Apr, 19 05:21 PM
रिंकु सिंगने सलामीवीर लीनला तोलामोलाची साथ देत संघाला तिहेरी आकडा पार करून दिला. कोलकाताने 15 षटकांत 4 बाद 116 धावा केल्या होत्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. 16व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात रिंकु बाद झाला. त्याने 25 चेंडूंत 30 धावा केल्या.
21 Apr, 19 05:08 PM
शाहबाद नदीमने सोडलेला सोपा झेल
21 Apr, 19 05:02 PM
रिंकु सिंगला जीवदान, नदीमने सीमारेषेवर झेल सोडला
21 Apr, 19 05:01 PM
कोलकाता नाइट रायडर्सला दमदार सुरुवातीनंतर चार फलंदाज झटपट गमवावे लागले.
IPL 2019 : अतिघाई, संकटातनेई; बेअरस्टोनंकेला'धोनी' स्टाईलरनआउटhttps://t.co/CaddQ5Qbfb@KKRiders@SunRisers@IPL@DineshKarthik#SRHvKKR
21 Apr, 19 04:45 PM
21 Apr, 19 04:44 PM
कर्णधार दिनेश कार्तिकही 5 धावांची भर घालून धावबाद झाला. एक अतिरिक्त धाव घेण्याच्या प्रयत्नात कार्तिक आपली विकेट गमावून बसला.
21 Apr, 19 04:38 PM
लीन आणि नितीश राणा ही जोडी कोलकाताला तारेल असे वाटत असताना भुवनेश्वर कुमारने धक्का दिला. त्याने राणाला (11) यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले.
21 Apr, 19 04:33 PM
कोलाकाताने पॉवर प्लेमध्ये 2 बाद 62 धावा केल्या. हैदराबादविरुद्धची ही कोणत्याही संघाने यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
21 Apr, 19 04:23 PM
21 Apr, 19 04:22 PM
पाचव्या षटकात खलीलने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. त्याने शुबमन गिलला झेलबाद केले. कोलकाताला 50 धावांवर दोन झटके बसले.
21 Apr, 19 04:19 PM
ख्रिस लीन आणि सुनील नरीन यांनी हैदराबादने दिलेले प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारत दमदार सुरुवात केली. या दोघांनी 2.3 षटकांत 42 धावा चोपल्या. हैदराबादच्या खलील अहमदच्या तिसऱ्या षटकात नरीनने 6,4,4 अशी फटकेबाजी केली, परंतु खलीलने चौथ्या चेंडूवर नरीनचा दांडा उडवला. नरीन 8 चेंडूंत 25 धावा ( 3 चौकार व 2 षटकार) करून माघारी परतला.
21 Apr, 19 03:59 PM
सनरायझर्स हैदराबाद संघाला सर्वाधिक 10 वेळा पराभूत करण्याचा विक्रम कोलकाता नाइट रायडर्सने केला आहे.
21 Apr, 19 03:56 PM
21 Apr, 19 03:54 PM
कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात तीन बदल.. रॉबीन उथप्पा, कुलदीप यादव आमि प्रसिध कृष्णा यांना विश्रांती देण्यात आली आहे. आंध्रप्रदेशचा डावखुरा गोलंदाज पृथ्वी राज आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. पृथ्वी राजने आतापर्यंत एकच ट्वेंटी-20 सामना खेळला आहे आणि तोही सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत.
21 Apr, 19 03:44 PM
21 Apr, 19 03:44 PM
21 Apr, 19 03:41 PM
21 Apr, 19 03:36 PM
21 Apr, 19 03:33 PM