जयपूर, आयपीएल २०१९ : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात स्टीव्हन स्मिथच्या रनिंग कॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण आयपीएलमध्ये बऱ्याच कालावधीनंतर स्मिथकडून अशी रनिंग कॅच पाहायाला मिळाली.
हैदराबादचा संघ सुरुवातीला चांगली फलंदाजी करत होती. डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी ७५ धावांची भागीदारी रचली. ही जोडी फोडण्यात मोलाचा वाटा उचलला तो स्मिथने. कारण वॉर्नरने एक मोठा फटका मारला होता. वॉर्नरला आता चौकार मिळणार असे वाटत होते. त्यावेळी स्मिथने सूर लगावत झेल पकडला आणि साऱ्यांनाच धक्का बसला.
पाहा हा खास व्हिडीओ
मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या दमदार खेळींच्या जोरावर
सनरायझर्स हैदराबादला १६० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने दोन विकेट्स मिळवल्या.
राजस्थानने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी २८ धावांची सलामी दिली. केन यावेळी १३ धावा करून बाद झाला, हैदराबादसाठी हा पहिला धक्का होता. त्यानंतर वॉर्नर आणि मनीष पांडे यांची चांगलीच जोडी जमली.
वॉर्नर आणि पांडे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. वॉर्नरच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. वॉर्नरने ३७ धावांची खेळी साकारली. वॉर्नर बाद झाल्यावर पांडेने काही काळ फटकेबाजी केली, पण त्याला शतकाची वेस ओलांडता आली नाही. पांडेने ३६ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर ६१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
Web Title: IPL 2019: Steven Smith took the running catch, watch the video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.