आयपीएल २०१९ : मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील लढत अखेर सुपर ओव्हरमध्ये गेली. अखेरच्या चेंडूवर हैदराबादला जिंकायला सात धावांची गरज होती. पण अखेरच्या चेंडूवर मनीष पांडेने षटकार ठोकल्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
मुंबईच्या १६३ आव्हानाचा सामना करताना हैदराबादला चांगली सुरुवात करता आली नाही. पण मनीष पांडेने अर्धशतक झळकावत संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. पण त्याला हा सामना हैदराबादला जिंकवून दिला आला नाही.
क्विंटन डी'कॉकच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सलासनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. डी'कॉकने ५८ चेंडूंत ६८ धावांची खेळी साकारली. या खेळीमध्ये डी'कॉकने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी'कॉक यांनी चांगली सुरुवात केली. पण आक्रमक खेळणाऱ्या रोहितला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. रोहितच्या रुपात मुंबईला मोठा धक्का बसला. रोहितला २४ धावा करता आल्या.
रोहित बाद झाल्यावर क्विंटन डी'कॉकने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रोहितनंतर सूर्यकुमार यादव, इव्हिन लुईस आणि हार्दिक पंड्या बाद झाले, पण क्विंटन डी'कॉकने मात्र एकबाजू लावून धरली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
Web Title: IPL 2019: Superover between Mumbai and Hyderabad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.