Join us  

IPL 2019 : सुरेश रैना-विराट कोहली यांच्यात शर्यत, कोण ठरणार कासव कोण ससा?

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 6:55 PM

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. लोकसभा निडवणुकांमुळे आयपीएल स्पर्धा भारतात होणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आयपीएल भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार वेळापत्रकही जाहीर केले. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे आमनेसामने येणार आहेत आणि त्याचीच सर्वांना अधिक उत्सुकता आहे. पण, या सामन्यात खरी शर्यत रंगणार आहे ती कोहली आणि सुरेश रैना यांच्यात... या दोघांनाही एक विक्रम खुणावत आहे आणि त्यात पहिली बाजी कोण मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे या सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील, अशी आशा आहे. दरम्यान, या सामन्यासाठी कोहली आणि धोनी यांनीही कसून सराव केला. कोहली अ‍ॅन्ड कंपनीने धोनीच्या धुरंधरांना त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली तर बेंगळुरुसाठी हा सर्वांत मोठा श्रीगणेशा ठरणार आहे. चेन्नई संघात ३० वर्षांवरील खेळाडू आहेत. धोनी आणि शेन वॉटसन हे दोघे ३७, तर ड्वेन ब्राव्हो ३५, फाफ डुप्लेसिस ३४ तसेच अंबाती रायुडू आणि केदार जाधव ३३, सुरेश रैना ३२, फिरकीपटू इम्रान ताहिर ३९ आणि हरभजनसिंग ३८ वर्षांचा आहे. राष्ट्रीय  संघाबाहेर असलेला कर्ण शर्मा ३१ आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा ३० वर्षांचा आहे. 

 

या संघाने वयावर मात करीत आयपीएलचे सामने गाजविले हे विशेष. नेहमी अव्वल चार संघात राहून चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधीही दिली. चेन्नई संघ तीनवेळेचा विजेता असला तरी बेंगळुरू संघात अनेक दिग्गज आहेत पण एकदाही त्यांना जेतेपद पटकवता आले नाही. पहिल्या सामन्याचा निकाल गोलंदाजांच्या कामगिरीवर तसेच दडपण झेलण्याच्या खेळाडूंच्या क्षमतेवर विसंबून असेल. चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा हे तसेच बेंगळुरु संघातून वेगवान उमेश यादव चांगल्या कामगिरीच्या बळावर वर्ल्ड कप संघात स्थान मिळविण्यास इच्छुक आहेत. 

 

पण, या सामन्यात रैना व कोहली यांच्यात सर्वात प्रथम 5000 धावा करण्याची शर्यत रंगली आहे. आजच्या सामन्यात या दोघांपैकी कोण प्रथम 5000 धावा करणार यासाठी दोघेही आतुर आहेत. या शर्यतीत बाजी मारण्यासाठी रैनाला 15 धावांची गरज आहे, तर कोहलीला 52 धावांची गरज आहे. रैनाने 176 सामन्यांत 4985 धावा केल्या आहेत, तर कोहलीने 163 सामन्यांत 4948 धावा केल्या आहेत.

टॅग्स :आयपीएल 2019सुरेश रैनाविराट कोहलीचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू