चेन्नई, आयपीएल 2019 : गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरु यांच्यात सलामीचा रंगला. या सामन्याच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे आमनेसामने येणार आहेत आणि त्याचीच सर्वांना अधिक उत्सुकता आहे. पण, या सामन्यात खरी शर्यत रंगली ती कोहली आणि सुरेश रैना यांच्यामध्ये आणि ही शर्यत जिंकली ती सुरेश रैनाने.
या सामन्यात रैना व कोहली यांच्यात सर्वात प्रथम 5000 धावा करण्याची शर्यत रंगली आणि ती रैनाने जिंकली. आजच्या सामन्यात या दोघांपैकी कोण प्रथम 5000 धावा करणार यासाठी दोघेही आतुर होते. या शर्यतीत बाजी मारण्यासाठी रैनाला 15 धावांची गरज होती, तर कोहलीला 52 धावांची गरज होती. या सामन्यापूर्वी रैनाने 176 सामन्यांत 4985 धावा केल्या होत्या, तर कोहलीने 163 सामन्यांत 4948 धावा केल्या होत्या. या सामन्यात १९ चेंडूंत १५ धावा करत रैनाने ही शर्यत जिंकली. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणार रैना हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे या सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील, अशी आशा आहे. दरम्यान, या सामन्यासाठी कोहली आणि धोनी यांनीही कसून सराव केला. कोहली अॅन्ड कंपनीने धोनीच्या धुरंधरांना त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली तर बेंगळुरुसाठी हा सर्वांत मोठा श्रीगणेशा ठरणार आहे. चेन्नई संघात ३० वर्षांवरील खेळाडू आहेत. धोनी आणि शेन वॉटसन हे दोघे ३७, तर ड्वेन ब्राव्हो ३५, फाफ डुप्लेसिस ३४ तसेच अंबाती रायुडू आणि केदार जाधव ३३, सुरेश रैना ३२, फिरकीपटू इम्रान ताहिर ३९ आणि हरभजनसिंग ३८ वर्षांचा आहे. राष्ट्रीय संघाबाहेर असलेला कर्ण शर्मा ३१ आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा ३० वर्षांचा आहे.