IPL 2019 : विराट कोहलीच्या RCBला अजूनही प्ले ऑफची संधी, जाणून घ्या कशी...

IPL 2019: दिल्ली कॅपिटल्सने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 16 धावांनी विजय मिळवून आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 10:07 AM2019-04-29T10:07:51+5:302019-04-29T10:09:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Virat Kohli-led RCB can still mathematically qualify for IPL 2019 playoffs - Here's how | IPL 2019 : विराट कोहलीच्या RCBला अजूनही प्ले ऑफची संधी, जाणून घ्या कशी...

IPL 2019 : विराट कोहलीच्या RCBला अजूनही प्ले ऑफची संधी, जाणून घ्या कशी...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल 2019 : दिल्ली कॅपिटल्सने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 16 धावांनी विजय मिळवून आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. 2012नंतर प्रथमच दिल्लीनं प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आणि शेफ्रान रुथर्फेनच्या फटकेबाजीनं दिल्लीनं 187 धावा केल्या. त्यानंतर अमित मिश्रा आणि कागिसो रबाडा यांची दमदार कामगिरी करताना बंगळुरूला 7 बाद 171 धावांवर रोखले. या पराभवामुळे बंगळुरूने सलग तीन सामन्यांत मिळवलेला मनोबल गमावला आहे. 


विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा बंगळुरूचा संघ गुणतालिकेत तळावर आहे. त्यांच्या खात्यात 12 सामन्यांनंतर 8 गुण आहेत. या आकडेवारीनुसार बंगळुरूचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पण, गणिताची आकडेमोड केल्यास त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची अजूनही संधी आहे. फक्त त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर अबलंबून रहावे लागणार आहे. 

बंगळुरूचे प्ले ऑफचे स्वप्न जीवंत, कसं ते जाणून घ्या
गुणतालिकेतील पहिले तीन स्थान हे बंगळुरूच्या कक्षेबाहेर आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे, तर मुंबई इंडियन्सही त्यांच्या जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी उर्वरित संघांमध्ये चुरस आहे. बंगळुरूचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांना राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांना नमवावेच लागणार आहे. पण, त्याचबरोबर त्यांना अन्य स्पर्धकांच्या कामगिरीवर अवलंबुन राहावे लागणार आहे. या सामन्यांतील कोणते निकाल बंगळुरूच्या पथ्यावर पडतील ते पाहूया... 

  • सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब - पंजाब
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स - बंगळुरू
  • चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स -  कोणीही
  • मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद - मुंबई 
  • किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाइट रायडर्स - कोलकाता
  • दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स - दिल्ली
  • रॉयल चॅलेंज बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद - बंगळुरू
  • किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स - चेन्नई
  • मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स - मुंबई

 

या निकालानंतर मुंबई इंडियन्सच्या खात्यात 18 गुण होती, तर दिल्ली व चेन्नई प्रत्येकी 20 गुणांसह आघाडीवर राहतील. बंगळुरू 12 गुणांसह चौथ्या स्थानावर राहु शकते. पंजाब व कोलकाता यांच्या खात्यातही 12 गुण असतील, परंतु बंगळुरुला सरासरीत कोलकाताला मागे टाकावे लागेल. हैदराबाद व राजस्थान यांच्या खात्यात 10 गुण राहतील. 
 

 

Web Title: IPL 2019: Virat Kohli-led RCB can still mathematically qualify for IPL 2019 playoffs - Here's how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.