जयपूर, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनीनेराजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जे केले, त्यावर माजी क्रिकेटपटूंसह नेटिझन्सकडून टीकेची झोड उठत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या सामन्यात धोनीनं पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट करत थेट मैदानावर धाव घेतली होती. त्याने मैदानावर उपस्थित पंचांशी हुज्जतही घातली. हेच जर विराट कोहली वागला असता, तर त्याला लगेच गर्विष्ठ ठरवून मोकळे झाले असते, आता धोनीला काय म्हणाल, असा संतप्त सवाल नेटिझन्स विचारत आहेत.
मिचेल सँटनरने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून दिला. चेन्नईचा हा सहावा विजय ठरला. 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला अखेरच्या तीन चेंडूंत 8 धावांची गरज होती. त्यावेळी राजस्थानचा गोलंदाज बेन स्टोक्सने फुल टॉस टाकला. पंचांनी सुरुवातीला नो बॉल देण्यासाठी हात वर केला, परंतु दुसऱ्या पंचांच्या सांगण्यावरून तो निर्णय बदलला. त्यानंतर धोनीने मैदानावर धाव घेत पंचांशी हुज्जत घातली. या कृत्यावर त्याला दंडही ठोठावण्यात आला. त्याचबरोबर अनेक माजी खेळाडूंनी धोनीवर सडकून टीका केली आहे.
धोनीच्या या वागण्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ, भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा व संजय मांजरेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यात नेटिझन्सनीही उडी मारली. पाहा ट्विट...