बंगळुरु, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली 46 धावांवर बाद झाला. विराटचे अर्धशतक यावेळी चार धावांनी हुकले. पण विराटने या सामन्यात आयपीएलमधील पाच हजार धावा पूर्ण केल्या.
यंदाचा आयपीएलचा हंगाम सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना की कोहली, कोण पाच हजार धावा पूर्ण करणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. पण रैनाने पहिल्याच सामन्यात पाच हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला.