Join us  

IPL 2019 : ख्रिस गेलची पकडलेली रनिंग कॅच तुम्ही पाहिली का, व्हिडीओ

क मोठा फटका मारताना त्याचा अप्रतिम झेल दीपक हुडाने पकडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 10:51 PM

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरनंतर पंजाबच्या ख्रिस गेलकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण गेलला या सामन्यात मोठी खेळी साकारता आली नाही. या सामन्यात गेल चांगली फटकेबाजी करत होती. एक मोठा फटका मारताना त्याचा अप्रतिम झेल दीपक हुडाने पकडला. गेलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला होता.

अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने रोमहर्षक विजय मिळवताना सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेट्सने पराभव केला. अखेरच्या तीन षटकात हैदराबादने भेदक मारा करताना सामना रोमांचक स्थितीत आणला. परंतु, सलामीवीर लोकेश राहुलने अखेरपर्यंत नाबाद राहताना 71 धावांचा तडाखा देत पंजाबच्या विजयावर शिक्का मारला. यासह पंजाबने 8 गुणांची नोंद करताना तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

 

अश्विनने केला सुपर रन आऊट, पाहा व्हिडीओ

 एखाद्या फलंदाजाला रन आऊट कसा करावा, याचा उत्तम वस्तुपाठ किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने दाखवून दिला. या सामन्यात अश्विनने ज्याप्रकारे सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला रन आऊट केले ते नजरेचे पारणे फेडणारे होते.

पंजाबने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हैदराबादने यावेळी सावध सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर हा एका बाजूने धावफलक हलता ठेवत होता. त्यावेळी त्याला तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद नबीची चांगली साथ मिळत होती. नबी आक्रमकपणे फटकेबाजी करत होता. त्यावेळी असा एक प्रकार घडला की साऱ्यांनाच धक्का बसला.

अश्विन 14वे षटक टाकत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूचा वॉर्नर सामना करत होता. त्यावेळी अश्विनच्या चेंडूवर वॉर्नरने मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट अश्विनच्या हातामध्ये गेला. त्यावेळी अश्विनने चलाखपणा दाखवला आणि नबीला रन आऊट केले.

 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर यांच्यातील मांकड प्रकरण चांगलेच गाजले. अश्विनने मांकड नियमानुसार धावबाद करण्यापूर्वी बटलरला एक ताकीद द्यायला हवी होती, असा सल्ला अनेकांनी दिला. पण, अश्विनने आपण नियमाचे उल्लंघन न केल्याचा दावा केला. या प्रकरणानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर नॉन स्ट्राईक एंडला असलेला प्रत्येक फलंदाज काळजी घेताना दिसत आहे. याची प्रचिती पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यातही आली. अश्विनला मांकड धावबाद करण्याची संधी मिळू नये यासाठी हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने चक्क एक शक्कल लढवली.

 

टॅग्स :ख्रिस गेलडेव्हिड वॉर्नरआयपीएल 2019