बेंगळुरू : सलग दोन विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यास उत्सुक आहे. आरसीबीने चेन्नई सुपरकिंग्सचा यापूर्वीच्या लढतीत एका धावेने पराभव केला होता. एबी डिव्हिलियर्स व कोहली गेल्या लढतीत फलंदाजीमध्ये विशेष यशस्वी ठरले नाही. आता ते मोठी खेळी करण्यास उत्सुक असतील.
पंजाबविरुद्ध पहिल्या लढतीत डिव्हिलियर्सने नाबाद ५९ व कोहलीने ६७ धावा केल्या होत्या. डेल स्टेनच्या समावेशानंतरही आरसीबीची गोलंदाजी कमकुवत आहे. गेल्या लढतीत धोनीने विजयासाठी १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उमेश यादवच्या अखेरच्या षटकात २४ धावा केल्या होत्या. यष्टिरक्षक पार्थिव पटेलने शार्दुल ठाकूरला धावबाद केल्यामुळे चेन्नईला सामना टाय करता आला नाही. यंदाच्या मोसमात १० सामन्यातील आरसीबीचा हा तिसरा विजय होता. कोहली अँड कंपनी यंदाच्या मोसमात पंजाबविरुद्ध आणखी एक विजय मिळवण्यास प्रयत्नशील राहील. पंजाब संघ गुणतालिकेत १० गुणांसह पाचव्या स्थानी आहे. आर. अश्विनच्या नेतृत्वाखालील संघाला गेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने दोन धावांनी पराभूत केले होते. आता ख्रिस गेल, के.एल. राहुल आणि डेव्हिड मिलर आरसीबीच्या कमकुवत माऱ्याचा लाभ घेत मोठी खेळी करण्यास उत्सुक असतील.
Web Title: IPL 2019: Watch RCB's victorious hat-trick against Punjab
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.