Join us

IPL 2019 : ऑरेंज, पर्पल कॅपचे आम्हाला घेणेदेणे नाही, सांगतायत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक

या खास मिटींगचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 20:05 IST

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले खरे, पण मुंबईच्या एकाही खेळाडूला ऑरेंज किंवा पर्पल कॅप पटकावता आली नाही. पण मुंबई इंडियन्सला या गोष्टीचे काहीच देणेघेणे नसल्याचे त्यांचे प्रशिक्षक सांगत आहेत. सामना संपल्यावर मुंबई इंडियन्सची एक मिटींग झाली. या खास मिटींगचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.

पाहा हा खास व्हिडीओविजयाचे सेलिब्रेशन झाल्यावर मुंबईच्या संघाची एक खास मिटींग झाली. या मिटींमध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी एक भाषण केले. या भाषणामध्ये ते म्हणाले की, " आपल्याला ऑरेंज कॅप मिळवता आली नाही. पर्पल कॅपही आपल्याकडे नाही. पण या गोष्टीची पर्वा आपल्याला नाही. कारण आयपीएलचा चषक आपल्याकडे आहे."

मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीला पुणेरी साज, ढोल-ताश्यांच्या गजरात झाली सुरुवातमुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद जिंकले आणि त्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक नुकतीच सुरु झाली आहे. या मुंबईच्या विजयी मिरवणूकीला पुणेरी साज चढल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या मिरवणूकीची सुरुवात झाली आहे ते पुणेरी ढोल-ताश्यांच्या गजरात.

पाहा हा खास व्हिडीओ

मुंबईच्या मिरवणूकीसाठी  खास बस बनवण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयी शिलेदारांनी खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता या मिरवणूकीला पेडर रोडपासून सुरुवात होईल आणि त्यानंतर ट्रायडंट हॉटेपर्यंत ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येतील. 

अशी असेल मिरवणूक....सायंकाळी 6.30 वाजता खुल्या बसमधून अँटिलिया येथून मिरवणूकीला सुरुवात होईलमिरवणूकीतील सुरुवातीचा 400 मीटरचा प्रवास हा पुणेरी ढोलच्या गजरात काढण्यात येणार आहेजस्लोक हॉस्पिटल ते मरीन ड्राईव्ह येथून बस ट्रायडंटच्या दिशेने नेण्यात येईल त्यानंतर रात्री 9 वाजता अँटिलिया येथे खेळाडू, संघ मालक, सेलिब्रिटी यांच्या उपस्थितील पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे .

 ... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओमुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या काही मुलाखती झाल्या. पण रोहितची खास मुलाखत घेतली ती त्याची पत्नी रितिकाने. यावेळी रितिकाने रोहितला काही भावुक प्रश्नही विचारले.

रितिकाने विचारले की, " समायराच्या समोर मुंबईने चौथ्यांदा आयपीएलचे जेतपद पटकावले आहे, याबद्दल तुला काय वाटते?" या प्रश्नावर रोहित म्हणाला की, " फक्त समायराच नाही तर तुझ्या उपस्थितीतही आम्ही जेतेपद पटकावले या गोष्टीचा आनंद आहे."

हा पाहा खास व्हिडीओ

रोहित आणि युवराजने केला 'गली बॉय'च्या गाण्यावर रॅप, व्हिडीओ वायरलआयपीएलचे जेतेपद पटकावल्यावर मुंबई इंडियन्सने एका पबमध्ये आपला आनंद साजरा केल्याचे वृत्त आहे. या पबमधील मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्या रॅप डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दोघांनी  'गली बॉय'च्या गाण्यावर डान्स केल्याचे या व्हीडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा पाहा खास व्हिडीओ

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल 2019