नवी दिल्ली, आयपीएल 2019 : कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलच्या आतषबाजीनं पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रसेलची बॅट चांगलीच तळपली, परंतु सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात कोलकाताला हार मानावी लागली. रसेलच्या धडाकेबाद अर्धशतकामुळे कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सपुढे धावांचे 186 आव्हान ठेवले. रसेलने 28 चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली. पण, सामन्यात एक क्षण असा आला की, कोलकाताच्या खेळाडूंचा काळजाचा ठोका चुकला होता. चौकार - षटकारांची आतषबाजी करणारा रसेल खेळपट्टीवर वेदनेनं कळवळताना दिसला.
दिल्लीने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या दहा षटकांमध्ये पाहायला मिळाले. कारण दिल्लीने कोलकात्याचा अर्धा संघ फक्त 61 धावांमध्ये गुंडाळला. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी कोलकात्याचा डाव सावरला. दिनेश कार्तिकनेही यावेळी 36 चेंडूंत 50 धावांची खेळी साकारली. दिल्लीच्या ख्रिस मॉरिसने रसेलला बाद केले.
पण, 14 व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर चेंडू आद्रे रसेलच्या खांद्यावर आदळला आणि तो जमिनीवर लोळू लागला. त्यामुळे सामन्यातील वातावरण गंभीर झाले होते. पण, अवघ्या काही मिनिटांत रसेल उभा राहिला... त्यानंतर रसेल वादळ घोंगावलं.
पाहा व्हिडीओ..
https://www.iplt20.com/video/157993
सुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडाचा तुफानी यॉर्करसुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सनेकोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना कोलकात्यापुढे 11 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला तीन धावांनी पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्याच्या नादात दिल्लीने आपले विकेट्स गमावले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. कारण दोन्ही संघांच्या निर्धारीत 20 षटकांमध्ये 185 धावा झाल्या. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजीला आला आणि त्यांनी एक विकेट गमावत 10 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने रसेल व कार्तिक ही जोडी मैदानावर पाठवली. रसेलने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला, पण रबाडाने तिसऱ्या चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून त्याचा दांडा उडवला. त्यानंतर दिल्लीनं 3 धावांनी हा सामना जिंकला.
पाहा व्हिडीओ..