IPL 2019 : जेव्हा धोनी रैनाला देतो बॅटींग टीप्स, व्हिडीओ वायरल

रैनाला जो सूर गवसला तो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीमुळे, असे म्हटले जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 07:22 PM2019-05-02T19:22:10+5:302019-05-02T19:23:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: When MS Dhoni gives batting tips to Suresh Raina, the video is viral | IPL 2019 : जेव्हा धोनी रैनाला देतो बॅटींग टीप्स, व्हिडीओ वायरल

IPL 2019 : जेव्हा धोनी रैनाला देतो बॅटींग टीप्स, व्हिडीओ वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल २०१९ : गेल्या काही सामन्यांमध्ये सुरेश रैनाकडून चांगली फलंदाजी होत नव्हती. पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मात्र रैनाची धकाकेदार फटकेबाजी पाहायला मिळाली. या सामन्यात रैनाला जो सूर गवसला तो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीमुळे, असे म्हटले जात आहे. 

नेट्समध्ये सराव करत असताना कशी फटकेबाजी करायची असले हे धोनीने रैना सांगितले. कोणते फटके कसे मारायचे आणि आपली बॅट तेव्हा कशी असायला हवी, याबाबत धोनी रैनाला मार्गदर्शन करत असल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हा पाहा व्हिडीओ


मॅचनंतर धोनीने वाटली चाहत्यांना गिफ्ट, पाहा व्हिडीओ
चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले. या विजयानंतर मैदानात एक वेगळाच सोहळा पाहायला मिळाला. सामना संपल्यावर धोनीने एक वेगळेच टी-शर्ट परीधान केले आणि त्यानंतर तो चाहत्यांना गिफ्ट्स देण्यासाठी तयार झाला.

हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरचा अखेरचा सामना होता. त्यामुळे विजयानंतर चेन्नईच्या संघाने मैदानाला एक फेरी मारली. यावेळी धोनीच्या हातामध्ये एक टेनिस रॅकेट आणि काही चेंडू दिले होते. त्यावेळी धोनीने हे चेंडू प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावले. यावेळी प्रत्येक चाहता हे अनमोल गिफ्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता.


हा पाहा व्हिडीओ


जेव्हा धोनी मारतो एका हाताने सिक्सर, व्हिडीओ वायरल
काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त असल्याचे म्हटले गेले होते. पण आजच्या सामन्यात मात्र धोनीने धडाकेबाज फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तर धोनीने चक्क एका हातेन षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्याच्या १९व्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. १९वे षटक दिल्लीचा ख्रिस मॉरिस टाकत होता. यावेळी मॉरिसच्या हातातून चेंडू सुटला आणि थेट धोनीच्या पोटाजवळ आला. हा चेंडू नो बॉल असल्याचे पंचांनी सांगितले. त्यानंतर धोनीने या चेंडूवर एका हाताने षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. 

धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर ८० धावांनी दमदार विजय मिळवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर शेन वॉटसनला एकही धाव करता आली नाही. पण त्यानंतर सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला सावरले. सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संयत फलंदाजी करत नवव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी रचली. फॅफच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. फॅफने ४१ चेंडूंत ३९ धावा केल्या. त्यानंतर सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रैनाने ३७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.

Web Title: IPL 2019: When MS Dhoni gives batting tips to Suresh Raina, the video is viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.