Join us  

IPL 2019 : जेव्हा उडी मारून पार्थिव पटेल स्टम्पिंगसाठी सरसावला, पाहा हा व्हिडीओ

आरसीबीचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलने चक्क हवेत उडी मारून स्टम्पिंग करायला प्रयत्न केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 9:09 PM

Open in App

बंगळुरु, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आजच्या सामन्यात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. आरसीबीचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलने चक्क हवेत उडी मारून स्टम्पिंग करायला प्रयत्न केला.

ही गोष्ट घेतली ती सहाव्या षटकामध्ये. हे षटक युजवेंद्र चहल टाकत होता. यावेळी चहलचा सामना करत होता तो मनीष पांडे. सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मनीष पांडेल चकला. त्याच्या पायाला लागून चेंडू पटेलच्या दिशेने गेला. त्यावेळी पटेलने हवेत उडी मारत मनीषला यष्टीचीत करण्याचा उत्तम प्रयत्न केला.

हा पाहा व्हिडीओ 

https://www.iplt20.com/video/186367

यंदाच्या आयपीएलमध्ये कोहली आज पहिल्यांदाच ठरला लकी, घडली 'ही' गोष्टयंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पण तरीदेखील कोहली आज सामन्यापूर्वी आनंदात पाहायला मिळाला. कारण यंदाच्या हंगामात ही गोष्ट पहिल्यांदाच कोहलीच्या बाबतीत पाहायला मिळाली.

या सामन्यात आरसीबीने संघात तीन बदल केले. सामन्यापूर्वी कोहली आणि हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन टॉससाठी एकत्र आले होते.  टॉस झाल्यावर कोहलीच्या चेहऱ्यावर स्मित फुलल्याचे पाहायला मिळाले. कारण यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कोहलीने नाणेफेक जिंकली होती.

नाणेफेक जिंकल्यावर कोहली म्हणाला की, " यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मी टॉस जिंकलो, त्यामुळे मी आनंदित आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये मला नाणेफेकीच्या कौलने हुलकावणी दिली होती. पण मोसमाच्या अखेरीस तरी मला टॉस जिंकता आला आहे."

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरयुजवेंद्र चहलआयपीएल 2019