मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने बुधवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर 37 धावांनी विजय मिळवला. मुंबईचा हा आतापर्यंतच्या आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला. यापूर्वी मुंबईने 174 सामन्यांमध्ये 99 विजय मिळवले होते. या सामन्यात मुंबईने विजयाचे शतक पूर्ण केले. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 'हार्दिक'ने मिठी मारली आणि तो ढसा ढसा रडू लागला. हार्दिकसोबत असं काय घडलं की तो रोहितला मिठी मारून रडू लागला, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना? रोहितला मिठी मारणारी ती व्यक्ती हार्दिक पांड्या नव्हती, तर रोहितचा एक फॅन होता.
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या आजी-माजी कर्णधारांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे किस्से आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. कोहली व धोनी हे आपापल्या फॅन्ससाठी अधूनमधून वेळ काढत असतात. कोहली व धोनी यांच्यापाठोपाठ हिटमॅनचाही फॅन फॉलोअर्स ग्रुप आहे आणि आयपीएलमध्ये हे फॉलोअर्स अधिक सक्रीय असतात. अर्थात मुंबई इंडियन्सने आणखी एक आयपीएल जेतेपद पटकवावे आणि रोहितच्या हातात तो विजयी चषक दिसावा, यासाठी हे फॅन्स प्रार्थना करतात. चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर रोहितने दोन चाहत्यांची भेट घेतली. रोहितला समोर पाहून या दोघांनाही आपले आनंदाश्रू आवरता आले नाही आणि दोघंही रडू लागले.
पाहा व्हिडीओ...
मुंबई टॉप...
चेन्नई एक्सप्रेस अखेर मुंबई इंडियन्सने रोखली. आतापर्यंत चेन्नईने तिन्ही सामन्यांत विजय मिळवला होता. पण चौथ्या सामन्यात त्यांना मुंबईने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 170 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 133 धावा करता आल्या. मुंबईने हा सामना 37 धावांनी जिंकला. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले, तर हार्दिक पंड्याने दमदार अष्टपैली कामिगरी केली. मुंबईचा हा दुसरा विजय, तर चेन्नईचा पहिला पराभव ठरला. मुंबईचा हा आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मुंबईच्या नावावर आहेत, तर या यादीमध्ये चेन्नईचे दुसरा आणि सनरायझर्स हैदराबादचा तिसरा कॅमांक लागतो. आतापर्यंत चेन्नईच्या संघाने 151 सामने खेळले आहे, यामध्ये त्यांना 93 सामन्यांमध्ये विजय आणि 56 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. हैदराबादच्या संघाने आतापर्यंत 96 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना 53 सामने जिंकता आले आहेत तर 42 सामन्यांध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
Web Title: IPL 2019: when Rohit Sharma meet his fans, watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.