IPL 2019 : ... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओ

यावेळी रितिकाने रोहितला काही भावुक प्रश्नही विचारले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 07:19 PM2019-05-13T19:19:13+5:302019-05-13T19:20:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: ... When Rohit Sharma's wife took his special interview, Watch video | IPL 2019 : ... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओ

IPL 2019 : ... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या काही मुलाखती झाल्या. पण रोहितची खास मुलाखत घेतली ती त्याची पत्नी रितिकाने. यावेळी रितिकाने रोहितला काही भावुक प्रश्नही विचारले.

रितिकाने विचारले की, " समायराच्या समोर मुंबईने चौथ्यांदा आयपीएलचे जेतपद पटकावले आहे, याबद्दल तुला काय वाटते?" या प्रश्नावर रोहित म्हणाला की, " फक्त समायराच नाही तर तुझ्या उपस्थितीतही आम्ही जेतेपद पटकावले या गोष्टीचा आनंद आहे."

हा पाहा खास व्हिडीओ


रोहित आणि युवराजने केला 'गली बॉय'च्या गाण्यावर रॅप, व्हिडीओ वायरल
आयपीएलचे जेतेपद पटकावल्यावर मुंबई इंडियन्सने एका पबमध्ये आपला आनंद साजरा केल्याचे वृत्त आहे. या पबमधील मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्या रॅप डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दोघांनी  'गली बॉय'च्या गाण्यावर डान्स केल्याचे या व्हीडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा पाहा खास व्हिडीओ


नीता अंबानींना चाहते म्हणतायत, आम्हालाही सांगा विजयाचा मंत्र
मुंबईने आयपीएलचे चौथे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीचा सामना रोमहर्षक झाला. अखेरचा चेंडू पडेपर्यंत नेमका कोणता संघ हा सामना जिंकेल, हे कोणाच्याही गावी नव्हते. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या मालकिण नीता अंबानी चांगल्याच टेन्शनमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अंबानी कुठलाही तरी मंत्र म्हणत असल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा मुंबईने सामना जिंकला तेव्हा अंबानी डोळे बंद करून मंत्र म्हणत होत्या, त्यामुळे त्यांना मुंबईचा विजय पाहता आला नाही. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, हा विजयाचा मंत्र नेमका आहे तरी काय. त्यामुळे आता चाहत्यांनी अंबानी यांना हा मंत्र शेअर करायची विनवणी केली आहे.

मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डच्या ( 25 चेंडूंत नाबाद 41 धावा ) धडाकेबाज खेळीच्या जोरावर 8 बाद 149 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 7 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेन वॉटसनने ( 80 धावा) एकाकी झुंज दिली. पण, अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाने चेन्नईच्या तोंडचा घास पळवला आणि मुंबईचे चौथ्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. 


Web Title: IPL 2019: ... When Rohit Sharma's wife took his special interview, Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.