कोलकाता, आयपीएल 2019 : एक काळ असा होता की, भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली एकत्र सलामीसाठी मैदानात उतरायचे. सचिन-गांगुली या जोडीने भारताला बऱ्याचदा चांगली सुरुवात करून दिली होती. एकेकाळी या दोघांचे क्रिकेट विश्वावर राज्य होते. पण हे दोघे निवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांची भेट मैदानात झाल्याचे दिसले नाही. पण आज मात्र सचिन आणि गांगुली यांची वानखेडे स्टेडियममध्ये भेट झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई इंडियन्सचा आज पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर होणार आहे. सचिन हा मुंबईकडून खेळत नसला तरी तो संघाचा आधारस्तंभ आहे. गांगुलीदेखील दिल्लीच्या संघाचा सल्लागार आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वी सचिन आणि गांगुली यांची भेट झाल्याचे पाहायला मिळाले. सचिन आणि गांगुली हात मिळवत असताना महेला जयवर्धनेच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्यकारक भाव होते.
खूशखबर! मुंबई इंडियन्सचे सामने मुंबईतच, जाणून घ्या वेळापत्रक
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) सहभागी संघांना घरच्या मैदानावर खेळता येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचे सामने ही तारेवरची कसरत पार करण्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) यश आले आहे. त्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या साखळी फेरीच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर किमात सात सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचेही सामने वानखेडे स्टेडियमवरच होणार असल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे सामने मुंबई बाहेर खेळवले जातील या प्रश्नावर मुंबई इंडियन्सचा झहीर खान म्हणाला की,''सुरक्षा यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेत सामन्यांचे ठिकाण ठरवण्यात येईल. मुंबईच्या मैदानावर खेळायला आम्हाला नक्की आवडेल, परंतु हे सामने कुठेही झाले तरी आम्ही खेळण्यास सज्ज आहोत. पण, आशा करतो की सामने मुंबईत व्हावेत.'' झहीरची प्रार्थना बीसीसीआयनं ऐकली आणि मुंबईला घरच्या मैदानावरच खेळावे लागणार आहे.
मुंबईत सामने कधी?
24 मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई
13 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
5 मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई
मुंबईबाहेरील सामने
28 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
30 मार्च : किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स, मोहाली
6 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद
18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
20 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर
26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
28 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
Web Title: IPL 2019: When Sachin tendulkar and saurav Ganguly meet on wankhede stadium ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.