Join us

IPL 2019 : जेव्हा स्पायडर कॅमेरा गेलला पाहून घाबरतो तेव्हा, पाहा व्हिडीओ

मैदानातील स्पायडर कॅमेरा हा गेलला घाबरल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 20:40 IST

Open in App

कोलकाता, आयपीएल 2019 : ख्रिस गेल हा मॅचमध्ये बऱ्याच गोष्टी करत असतो. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यामध्ये तर गेलचा एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. मैदानातील स्पायडर कॅमेरा हा गेलला घाबरल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले.

हा सामना सुरु असताना गेल क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी हा कॅमेरा गेलचा पाठलाग करत त्याच्या मागे गेला. ही गोष्ट जेव्हा गेलला समजली तेव्हा गेल त्या कॅमेराच्या दिशेने रागात चालत आला. त्यावेळी आपले आता काही खरे नाही, असे कॅमेरा ऑपरेटरला वाटले असावे. कारण जसा गेल कॅमेराजवळ गेला, तसा कॅमेरा हवेत झेपावल्याचे पाहायला मिळाले.

पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :ख्रिस गेलकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019