बंगळुरू, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर पाचव्या सामन्यात करो वा मरो परिस्थिती ओढावली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरू संघाला चारपैकी एकही सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. आज त्यांना कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करावा लागणार आहे. बंगळुरू हा सामना घरच्या चाहत्यांसमोर खेळणार असले तरी चिन्नास्वामीवरील आकडेवारी कोहलीचे टेंशन वाढवणारी आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत बंगळुरूचा संघ तळाच्या स्थानावर आहे, तर कोलकाता 3 सामन्यांत दोन विजयासह चौथ्या स्थानावर आहे.
- बंगळुरू आणि कोलकाता यांच्या आतापर्यंत 22 सामने झाले आहेत आणि त्यापैकी 13 सामने कोलकाताने जिंकले आहेत. 2017 मध्ये उभय संघांत झालेल्या चार सामन्यांत कोलकाताने बाजी मारली आहे.
- आयपीएलच्या 12व्या मोसमात एकही विजय न मिळवणारा बंगळुरू हा एकमेव संघ आहे. बंगळुरूला चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद संघांकडून दारूण पराभव पत्करावा लागला, तर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून त्यांनी हातचा सामना गमावला.
- सलग चार सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे बंगळुरूचा प्ले ऑफ प्रवेशाचा मार्ग खडतर बनला आहे. त्यांना उर्वरित 10पैकी 7 सामन्यांत आता विजय मिळवावा लागणार आहे.
- कोलकाताच्या विजयात आंद्रे रसेलची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला आहे आणि तोही सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.
- सुनील नरीन कोलकाताच्या चमूत परतणार असल्याने बंगळुरूचे टेंशन अधिक वाढले आहे.
सामन्याची वेळ : रात्री 8 वाजता