Join us  

कोण आहे रियान पराग?; १७ वर्षांच्या पोरानं हिरावला कोलकात्याच्या विजयाचा घास 

कोलकात्याविरुद्ध केलेल्या दणकेबाज कामगिरीनंतर रियान परागच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 3:33 PM

Open in App

कोलकाता - आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या एका रंगतदार लढतीत राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईटरायडर्सचा शेवटच्या षटकामध्ये पराभव केला होता. आव्हानाचा पाठलाग करताना निम्मा संघ तंबूत परतल्यावर 17 वर्षीय रियान पराग याने दमदार खेळी करून कोलकात्याच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. दरम्यान, कोलकात्याविरुद्ध केलेल्या दणकेबाज कामगिरीनंतर रियान परागच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तसेच हा 17 वर्षीय युवा खेळाडू कोण याची अधिक माहिती क्रिकेटपटूंकडून घेतली जात आहे. रेयान पराग याला केवळ 17 वर्षे 152 दिवस एवढ्या कमी वयात आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. रेयान हा आसाममध्ये वास्तव्यास असून, युवा क्रिकेटपटूंमधील प्रतिभावंत खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. केवळ 15 वर्षांचा अशताना त्याने आसामकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. युवा रियान पराग हा भारताचा कर्णधार विराट कोहलीला आपला आदर्श मानतो. तसेच रियान हा फलंदाजीसोबतच किफायतशीर गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे एक गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.  सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत रियान पराग याने आपली चमक दाखवली होती. या स्पर्धेत आसामकडून खेळताना 10 सामन्यांतील 9 डावांमध्ये त्याने 21.87 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राइक रेटने त्याने 175 धावा फटकावल्या होत्या. त्यात दोन अर्धशतकांचाही समावेश होता. तसेच त्याने तीन बळीही टिपले होते.  तसेच प्रथमश्रेणी आणि लिस्ट ए स्पर्धांमध्येही त्याने चमक दाखवली होती. 

  

टॅग्स :आयपीएल 2019राजस्थान रॉयल्स