जयपूर, आयपीएल 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर. अश्विन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तर आयपीएलचे चेअरमन राजीन शुक्ला यांनीदेखील अश्विन चुकीचा वागला असे मान्य केले आहे. त्यामुळे आता अश्विनवर आयपीएलचे गर्व्हनिंग कौन्सिल काय कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
सोमवारी झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 'मांकड' नियमामुळे चांगलाच गाजत आहे. पंजाबचा कर्णधार आर अश्विन याने राजस्थानच्या जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केले. पण, त्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. पण आयपीएलपूर्वी कर्णधार आणि पंचांची एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये 'मांकड' नियमानुसार कोणत्याही फलंदाजाला आऊट करता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. ही गोष्ट आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितली आहे.
शुक्ला याबाबत म्हणाले की, " आयपीएल सुरु होण्यापूर्वी कोलकाता येथे कर्णधार, पंच आणि सामनाधिकारी यांनी एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये 'मांकड' नियमानुसार कोणत्याही फलंदाजाला आऊट करू नये, कारण ते शिष्टाचाराला धरून होत नाबी, असे सांगण्यात आले होते. या बैठकीला विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीही उपस्थित होते. "
श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेन येथे झालेल्या कॉमनबेल्थ बँक वन डे सीरिजमधील सामन्यात अश्विनने लाहिरु थिरिमानेला मांकड नियमानुसार बाद केले होते. त्यावेळी संघातील सर्वात अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि प्रभारी कर्णधार वीरेंद्र सेहवाग यांनी खिलाडूवृत्ती दाखवताना थिरिमानेविरुद्धची अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अश्विन संघातील कनिष्ठ सदस्य होता आणि त्याने नियमात राहून फलंदाजाला बाद केले होते. पण, वरिष्ठ खेळाडूंचे विचार वेगळे होते.
बटलरबद्दल बोलायचे झाल्यास 2014मध्ये तो अशाच प्रकारे बाद केले होते. श्रीलंकेच्या सचित्र सेनानायकेने त्या सामन्यात बटलरला आधी ताकीद दिली होती. पण, तरिही तो क्रीझ सोडून पुढे गेला.
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही 1992 साली पीटर कर्स्टनला असेच बाद केले होते, परंतु त्यांनी कर्स्टनला ताकीद दिली होती.
Web Title: IPL 2019: Will IPL take action Against R. Ashwin?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.