नवी दिल्ली, आयपीएल 2019 : गोलंदाजी करताना क्रीझच्या पुढे पाय पढला तर नो-बॉल दिला जातो. फलंदजाच्या डोक्यावरून बॉल गेला किंवा फलंदाजाच्या थेट कंबरेच्यावर चेंडू गेला तर नो-बॉल दिला जातो. एका षटकामध्ये दोन बाऊन्सर टाकले की नो-बॉल दिला जातो. पण किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात एक अनोखा नो-बॉल पाहायला मिळाला, पण असा नो-बॉल यापूर्वी तुम्ही पाहिला नसेल.
नो-बॉल कसा पडला, तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहा...
पंजाबचा मुरुग्गन अश्विन चेंडू टाकत असताना चुकला आणि त्याचा योग्य चेंडू टप्प्यावर पटला नाही. हा चेंडू अश्विनच्या समोरच पडला आणि 4-5 टप्पा पडून पुढे गेला. यावेळी मैदानातील पंचांनी हा नो-बॉल असल्याचा निर्णय दिला.
... अशी कॅच तुम्ही आतापर्यंत पाहिली नसेलच, ख्रिस गेललाही विश्वास बसला नाहीदिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने धडाकेबाज फलंदाजी केली. पण ख्रिस गेलचा झेल जो यावेळी पकडला तो तुम्ही कधीही पाहिला नसेल. गेलला तर हा झेल पकडलाय यावर विश्वाच बसला नाही.
बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गेलने षटकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरही गेलने मोठा फटका मारला. पण हा चेंडू सीमारेषेजवळ असलेल्या कॉलिन इन्ग्रामने पकडला. पण चेंडू पकडल्यावर त्याला तोल जात होता. आपला तोल जातोय हे कॉलिनला समजले. त्यावेळी त्याने आपल्या जवळ कोणी क्षेत्ररक्षण आहे का, हे पाहिले. त्यावेळी अक्षर पटेल कॉलिनच्या जवळ होता. त्यावेळी कॉलिनने हा चेंडूं थेट अक्षरच्या हातामध्ये फेकला आणि गेल बाद झाला.
गेल आऊट आहे कि नाही, हे मैदानावरील पंचांनाही ठरवता येत नव्हते. त्यावेळी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी बऱ्याच वेळा ही गोष्ट पाहिली आणि अखेर गेल बाद असल्याचा निर्णय दिला.