नवी दिल्ली : संजू सॅमसनआयपीएलच्या पुढील पर्वात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्यासह अनेक खेळाडूंच्या कराराचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. चेन्नई सुपरकिंग्सने सुरेश रैना याला संघात कायम ठेवले आहे. आठही संघांना १४ व्या पर्वात खेळणाऱ्या त्यांच्या खेळाडूंची यादी बुधवारपर्यंत द्यायची होती.
रॉयल्स संघाचे मालक मनोज बदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजूने रॉयल्ससाठी पदार्पण केले होते. मागच्या आठ वर्षांपासून तो संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. आरसीबीने दिल्लीकडून डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल यांना रोख रकमेद्वारे स्वत:कडे घेतले.
नेतृत्व करण्यास उत्सुक
‘मी नेतृत्व पदाचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहे. अनेक उत्कृष्ट खेळाडूंनी रॉयल्सचे नेतृत्व केले असून मी राहुल द्रविड, शेन वाॅटसन, अजिंक्य रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याकडून बरेच काही शिकलो.’ - संजू सॅमसन
कर्णधार म्हणून स्मिथ ‘फ्लॉप’ -
यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३ व्या पर्वात स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स अखेरच्या स्थानावर राहिला. स्मिथने सर्व १४ साखळी सामन्यात ३११ धावा केल्या होत्या. संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या नेतृत्वावर टीका झाली. २०१८ आधी रॉयल्सने केवळ स्मिथला कायम ठेवले होते. त्याला १२.५ कोटीत खरेदी करण्यात आले होते. त्याच्याकडे नेतृत्वदेखील सोपिवण्यात आले, मात्र द. आफ्रिकेविरुद्ध चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतर त्याने पद सोडले होते.
आयपीएल संघ यादी -
रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर -
(३५.७ कोटी शिल्लक)
रिलीज खेळाडू : मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, एरॉन फिंच,ख्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उडाना, उमेश यादव.
रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे.
चेन्नई सुपर किंग्स -
(२२.९ कोटी शिल्लक)
रिलीज खेळाडू : केदार जाधव, हरभजनसिंग, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन.
रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन.
सनरायजर्स हैदराबाद -
(१०.१ कोटी रुपये शिल्लक)
रिलीज खेळाडू : बिली स्टेनलेक, विराट सिंह, बावनका संदीप, फैबियन एलन आणि संजय यादव.
रिटेन खेळाडू : केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, टी. नटराजन, शहबाज नदीम, राशिद खान, बासिल थम्पी, सिद्धार्थ कौल.
दिल्ली कॅपिटल्स -
(९ कोटी शिल्लक)
रिलीज खेळाडू : मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल, संदीप लामिछाने, एलेक्स कैरी, जेसन रॉय.
रिटेन खेळाडू : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स.
कोलकाता नाईटरायडर्स -
(८.५ कोटी शिल्लक)
रिलीज खेळाडू : टॉम बैंटन, ख्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, निखिल नाइक, हॅरी गर्नी, एम सिद्धार्थ.
रिटेन खेळाडू : शुभमन गिल, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, नीतीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हैरी गर्नी, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिन्स इयोन मोर्गन, वरुण चक्र वर्ती, सिद्ध कृष्ण, रिंकूसिंग, संदीप वॉरियर, निखिल नाइक आणि राहुल त्रिपाठी.
मुंबई इंडियन्स -
(१.९५ कोटी शिल्लक)
रिलीज खेळाडू : लसिथ मलिंगा, नाथन कुल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅक्लेनघन, प्रिंस बलवंत सिंह, दिग्विजय देशमुख.
रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीतसिंग.
किंग्स इलेव्हन पंजाब -
(१६.५ कोटी शिल्लक)
रिलीज खेळाडू : ग्लेन मॅक्सवेल, करु ण नायर, हार्डस विलोजेन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉटरेल, जिमी नीशम, कृष्णप्पा गौथम, तिजंदर सिंह.
रिटेन खेळाडू : केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, सिमरन सिंह, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नळकांडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड़, इशान पोरेल.
राजस्थान रॉयल्स -
(१४.७५ कोटी रुपये शिल्लक)
रिलीज खेळाडू : स्टीव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, आकाश सिंह, वरु ण एरॉन, टॉम कुरेन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह
रिटेन खेळाडू : संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवितया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, ॲन्ड्रयू टाय जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा आणि रॉबिन उथप्पा.
Web Title: IPL 202: Smith removed, Samson retains Rajasthan Royals captain, Raina retains CSK; Here is the list of teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.