- ललित झांबरे
आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत शेकडो सामने खेळले गेले आहेत पण सोमवारी राॕयल चॕलेंजर्सने (RCB) नाईट रायडर्सवर (KKR) जो विजय मिळवला तसा आतापर्यंत एकही सामना झालेला नव्हता.
असं काय घडलं या सामन्यात जे आयापीएलच्या 13 वर्षांच्या इतिहासात कधीही घडलं नव्हतं. तर हा पहिला असा सामना आहे ज्यात खेळलेल्या 11 पैकी 10 खेळाडूंचं विजयात काहीना काही योगदान राहीले आहे.
आरोन फिंच (47) , देवदत्त पडीक्कल (32) , विराट कोहली (नाबाद 33) व एबी डीविलियर्स (नाबाद 73) या चौघांनी फलंदाजीत योगदान दिलं तर ख्रिस माॕरिस (2 विकेट), वाॕशिंग्टन सुंदर (2 विकेट) आणि नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल व उदाना यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. याप्रकारे 10 जणांनी योगदान दिले. राहिला एकमेव कोण तर तो शिवम दुबे!
आयपीएलच्या इतिहासात सामना जिंकण्यात 10 खेळाडूंनी योगदान देताना किमान 30 च्यावर धावा आणि किमान एक तरी विकेट काढली असा हा पहिलाच सामना ठरला.
एवढंच नाही तर पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स, चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाईट रायडर्सना मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात मात दिली आहे आणि 2013 नंतर पहिल्यांदाच चॅलेंजर्सने आपले 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. याशिवाय आयपीएल जिंकलेल्या प्रत्येक संघाला (सीएसके, एमआय, एसआरएच, केकेआर व आरआर) या संघांना त्यांनी मात दिली आहे.