इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13वा मोसम सुरू होण्यासाठी आता बरोबर 30 दिवस राहिले आहेत. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स आज संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे दाखल झाले आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेतील सामने संयुक्त अरब अमिराती, दुबई आणि शाहजाह या तीन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. भारतीय खेळाडू सज्ज झाले असले तरी प्रत्येक संघातील परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत अजूनही अनिश्चितता आहे. इंग्लंड- ऑस्ट्रेलिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय मालिकेमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना दोन देशांतील खेळाडू मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व संघांची चिंता वाढली आहे.
CPL 2020 : व्हॉट ए कॅच... डॅरेन सॅमीनं टिपलेला झेल पाहून फलंदाज स्तब्ध, Video
एकही जेतेपद पटकावण्यात अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) संघावर आतापासूनच दडपण आहे. पण, यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात RCB यशस्वी होईल, अशी अनेकांना आशा आहे. त्यांच्या या अपेक्षांना बळकटी देणारी बातमी गुरुवारी फ्रँचायझींनी दिली. RCBनं ट्विट करून त्यांच्या चाहत्यांसाठी गोड बातमी दिली.
IPL 2020 : किंग्स इलेव्हन पंजाबपाठोपाठ आणखी एक संघ दुबईत पोहोचला, पाहा फोटो
IPL 2020 : दुबईत पोहोचले किंग्स इलेव्हन पंजाबचे खेळाडू ; राहणार या आलिशान हॉटेलमध्ये!
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसह CSKच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट; हरभजन सिंग संघासोबत यूएईला नाही जाणार
आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांना दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि त्याचा मोठा फटका RCBला बसणार होता. आफ्रिकेत कडक लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन आणि ख्रिस मॉरिस यांच्या सहभागावर साशंकता होती. पण, या तिघांनाही तेथील सरकारनं परवानगी दिली असून आता ते आयपीएलसाठी प्रवास करणार आहेत. RCBचे चेअरमन संजीव चुरीवाला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी RCBचा संघ दुबईत दाखल होईल आणि 22 ऑगस्टला एबी, स्टेन आणि मॉरिस हे तिघेही RCBच्या कॅम्पमध्ये जॉईन होतील.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CPL 2020 : किप डिस्टन्स!; कोरोना व्हायरसमुळे विकेट सेलिब्रेशनची स्टाईलच बदलली, पाहा हा व्हिडीओ
अथिया शेट्टीच्या 'स्विमसूट' घातलेल्या फोटोवर लोकेश राहुलनं केलेल्या कमेंटनं चाहते चक्रावले
महेंद्रसिंग धोनीकडून 'या' तीन गोष्टी शिकण्यासारख्या; आनंद महिंद्रा यांचं मोजक्या शब्दात कौतुक
विनम्रता, साधेपणा, हार-जीत, हेअरस्टाईल; पंतप्रधान मोदींचं धोनीला खास पत्र