इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज आणि 10 स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे चेन्नईच्या सर्व खेळाडूंना पुन्हा क्वारंटाईन करावं लागलं. कोरोना पॉझिटिव्ह असलेला खेळाडू हा जलदगती गोलंदाज असून तो नुकताच भारतीय संघाकडून खेळला होता, असे सांगण्यात येत होते. शनिवारी तो गोलंदाज कोण, हे समोर आलं आणि चेन्नई ते दुबई प्रवासात तो सुरेश रैनासह अनेकांचा संपर्कात आल्याचेही समोर आले आहे. तो गोलंदाज दीपक चहर आहे आणि आता त्याचं जुनं ट्विट व्हायरल होऊ लागलं आहे.
45 हजारांचा ड्रेस अन् जंगी पार्टी; विराट-अनुष्कानं दुबईत केक कापून साजरा केला आनंद!
भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल ) 13वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीय येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संघ एक महिना आधीच येथे दाखल झाले आणि 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून अनेक संघाचे खेळाडू सरावासाठी मैदानावरही उतरले. पण, चेन्नईचा संघ अजूनही क्वारंटाईनमध्ये आहे.
''चेन्नईसाठी हे आव्हानात्मक कालावधी आहे. चेन्नईच्या खेळाडूंची अनेकवेळा चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना सरावाची परवानगी दिली जाईल. चहरला आता 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर त्याची चाचणी केली जाईल आणि 24 तासांत दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला मैदानावर उतरण्याची संधी मिळेल,''असे CSKच्या सूत्रांनी सांगितले.
काय आहे व्हायरल ट्विट?चेन्नईचे खेळाडू दुबईसाठी रवाना झाले तेव्हा दीपकनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात त्याच्यासह सुरेश रैना, पियुष चावला, कर्ण शर्मा आदी खेळाडू दिसत होते, परंतु एकानंही मास्क घातला नव्हता. त्यावर दीपकचा भाऊ राहुल चहर जो मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे, त्यानं मास्क कुठेय असं विचारलं होतं. त्यावर दीपक म्हणाला होता की,''आमच्या सर्वांचा रिपोर्ट दोन वेळा निगेटिव्ह आला आहे आणि कुटुंबीयांसोबत असताना आम्ही मास्क घालत नाही.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स संघातील पुणेकर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; सुरेश रैनानं घेतली माघार, मायदेशी परतला
IPL 2020 : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह गोलंदाज कोण ते समजलं; सुरेश रैनासह आलेला इतरांच्या संपर्कात
IPL 2020 : विमानतळावरील 'झप्पी' CSKच्या खेळाडूंना महागात पडली? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल