इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) 13वा मोसम तोंडावर असताना चेन्नई सुपर किंग्सला धक्के बसले आहेत. त्यांचे दोन खेळाडूंसह 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यात संघाचा उपकर्णधार सुरेश रैनानं वैयक्तीक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आणि तो मायदेशात परतला. त्यामुळे आता अंतिम 11 शिलेदार निवडताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोर आव्हान असणार आहे. त्यात सीएसकेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगही यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त अनेक इंग्रजी वेबसाईटन्सनी प्रसिद्ध केलं आहे.
रैनाच्या जागी CSKच्या संघात मिळणार मराठमोळ्या फलंदाजाला संधी; वॉटसनसोबत करणार ओपनिंग
सुरेश रैनासारख्या अनुभवी खेळाडूनं माघार घेतल्यानं सीएसकेची डोकेदुखी आधीच वाढली आहे. संघ मालक एन श्रीनिवासन जरी म्हणत असले की, रैनाच्या जाण्याने फरक पडणार नाही, तरी सीएसकेसाठी तो मोठा धक्काच आहे. आता भज्जीच्या रुपानं आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. भज्जीनं सीएसकेच्या चेन्नईत झालेल्या सराव शिबिरात सहभाग घेतला नव्हता आणि तो संयुक्त अरब अमिराती येथे नंतर दाखल होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघाचा फिरकीपटू मंगळवारी यूएईसाठी रवाना होणार आहे, परंतु दुबईतील संघातील कोरोना सदस्यांची संख्या लक्षात घेता, तो पुनर्विचार करत आहे.
''मंगळवारी हरभजन दुबईत दाखल होणार आहे, परंतु सीएसकेतील सद्याची स्थिती पाहता, त्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे तो दुबईत दाखल होण्याची तारीख बदलू शकतो किंवा यंदाच्या आयपीएलमधून माघार घेऊ शकतो,''असे त्याच्या नजिकच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. मात्र, यावर अद्याप हरभजनची प्रतिक्रिया आलेली नाही.
काही वृत्तांनुसार सीएसके संघातील बरेच वरिष्ठ खेळाडूही सद्यपरिस्थितीमुळे चिंतीत आहेत. रैनानं माघार घेतली आहे.. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे आणखी एखादा झटका सीएसकेला महागात पडू शकतो.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video: ट्वेंटी-20त 195 धावा करूनही पाकिस्तान पराभूत; इंग्लंडनं बदड बदड बदडले!
कोट्याधीश महेंद्रसिंग धोनीकडे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे 1,800 रुपये थकीत!
हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप
किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!