Indian Premier League ( IPL 2020) गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) तीन सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला आहे. मधल्या फळीतील उणीव, महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) फलंदाजीला येण्याचा क्रम, गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव यामुळे CSKची डोकेदुखी वाढलेली होती. त्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ( Mumbai Indians) पहिल्याच सामन्यात मॅच विनिंग खेळी करणाऱ्या अंबाती रायुडूला ( Ambati Rayudu) दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांना मुकावे लागले. अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo) हाही अजून एकही सामना खेळू शकलेला नाही. रायुडू आणि ब्राव्हो यांच्या दुखापतीबाबत मंगळवारी मोठी अपडेट्स CSKचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी दिले.
चेन्नई सुपर किंग्सची ( CSK) तीन सामन्यांतील कामगिरी
सौरभ तिवारीच्या दमदार खेळाच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 9 बाद 162 धावा उभारल्या, परंतु तिवारीच्या दमदार खेळीचा शेवट फॅफ डू प्लेसिसच्या अप्रतिम झेलनं केला. सीमारेषेवर फॅफनं अफलातून झेल टिपला आणि सामन्याचे चित्र बदलले. त्यानंतर अंबाती रायुडूनं अर्धशतकी खेळी करताना CSKला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
शारजात झालेल्या पहिल्याच सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) चे वादळ घोंगावले आणि CSKच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. राजस्थान रॉयल्सनं 7 बाद 216 धावांचा डोंगर उभा केला आणि हे लक्ष्य पेलवण्यात महेंद्रसिंग धोनीचा संघ अपयशी ठरला. CSKला 6 बाद 200 धावा करता आल्या. या सामन्यात MS Dhoni 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानं टीका झाली. अंबाती रायुडूला दुखापतीमुळे या सामन्यात मुकावे लागले.
चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) सलग दुसऱ्या पराभावाचा, तर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. CSK फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरले. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी CSKच्या गोलंदाजांची धुलाई केली. 3 बाद 175 धावांचा पाठलाग करताना CSKला 7 बाद 131 धावाच करता आल्या. DCने सांघिक खेळ करत गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली.
चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) पुढील सामना 2 ऑक्टोबरला ( शुक्रवारी) सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्याविरुद्ध होणार आहे. या सामन्यात अंबाती रायुडू व ड्वेन ब्राव्हो हे मैदानावर उतरणार आहेत. ही दोघंही पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहेत. ''रायुडू दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे आणि पुढील सामना खेळणार आहे. त्यानं सराव सत्रात सहभाग घेतला आणि फलंदाजीही केली,''असे CSK चे CEO कासी विश्वनाथन यांनी सांगितले. ब्राव्हो तंदुरुस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: IPL 2020: Ambati Rayudu & Dwayne Bravo Fit to Play for CSK, Says CEO Kasi Viswanathan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.