इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी लिलाव झाला. पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी भाव खाला. पहिल्या फेरीत कोणाला किती भाव मिळाला आणि कोण राहिलं Unsold ते पाहूया...
या लिलावात पहिलेच नाव कोलकाता नाइट रायडर्सनं रिलीज केलेल्या ख्रिस लीनचं नाव आलं. या खेळाडूसाठी चुरस पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली. मुंबईनं 2 कोटीच्या मूळ किमतीत त्याला आपल्या ताफ्यात घेतले. कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केले होते. एक कोटी मूळ किंमत असलेल्या फिंचला RCBनं 4.40 कोटींत आपल्या ताफ्यात करून घेतलं. आयपीएलमधील त्याचा हा आठवा संघ आहे. यापूर्वी त्यानं राजस्थान रॉयल्स ( 2010), दिल्ली डेअरडेव्हिल्स ( 2011-12), पुणे वॉरियर्स इंडिया ( 2013), सनरायझर्स हैदराबाद ( 2014), मुंबई इंडियन्स ( 2015), गुजरात लायन्स ( 2016-17) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( 2018) आदी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजले. त्याची मूळ किंमत 2 कोटी होती. पण, कमिन्सनं हा विक्रम मोडला. त्याला कोलकाता नाइट रायडर्सनं 15.50 कोटीत खरेदी केले. आयपीएलच्या लिलावात ही दुसरी सर्वोत्तम बोली ठरली. यात युवराज सिंग 16 कोटींसह ( दिल्ली कॅपिटल्स 2015) अव्वल स्थानावर आहे. या यादीत बेन स्टोक्स ( 14.50 कोटी), युवराज ( 14 कोटी), दिनेश कार्तिक ( 12.50 कोटी), बेन स्टोक्स ( 12.50 कोटी) आणि टायमल मिल्स ( 12 कोटी) यांचा क्रमांक येतो.
खेळाडू मूळ किंमत संघ किंमत
अॅरोन फिंच 1 कोटी रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू 4.40 कोटी
ख्रिस लीन 2 कोटी मुंबई इंडियन्स 2 कोटी
इयॉन मॉर्गन 1.5 कोटी कोलकाता नाइट रायडर्स 5.25 कोटी
चेतेश्वर पुजारा 50 लाख खरेदी केले नाह
जेसन रॉय 1.50 कोटी दिल्ली कॅपिटल्स 1.50 कोटी
रॉबीन उथप्पा 1.50 कोटी राजस्थान रॉयल्स 3 कोटी
हनुमा विहारी 50 लाख खरेदी केले नाही
स्टुअर्ट बिन्नी 50 लाख खरेदी केले नाही
पॅट कमिन्स 2 कोटी कोलकाता नाइट रायडर्स 15.50 कोटी
सॅम कुरन 1 कोटी चेन्नई सुपर किंग्स 5.50 कोटी
कॉलीन डी ग्रँडहोम 75 लाख खरेदी केले नाही
ग्लेन मॅक्सवेल 2 कोटी किंग्स इलेव्हन पंजाब 10.75 कोटी
ख्रिस मॉरिस 1.50 कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10 कोटी
युसूफ पठाण 1 कोटी खरेदी केले नाही
ख्रिस वोक्स 1.50 कोटी दिल्ली कॅपिटल्स 1.50 कोटी
Web Title: IPL 2020 Auction: Round 1, list of Sold and Unsold players in today auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.