पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगला ( IPL) अद्याप सात महिन्यांचा कालावधी आहे. पण, आतापासूनच सर्व फ्रँचायझी संघबांधणीला सुरुवात केली आहे. काही फ्रँचायझींनी खेळाडूंची अदलाबदलही केली आहे. पुढील वर्षी ही स्पर्धा एप्रिलमध्ये खेळवण्याची शक्यता आहे. 2021च्या हंगामात प्रत्येक संघात नवे खेळाडू दिसतील आणि त्यासाठी 19 डिसेंबर 2019मध्ये लिलाव होणार आहे. 2019च्या आयपीएलसाठीचा लिलाव हा डिसेंबर 2018मध्ये झाला होता.
बीसीसीआयनं यावेळी लिलावासाठीचे स्थळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंगळुरूएवजी हा लिलाव आता कोलकाता येथे होणार आहे. या लिलावानंतर 2021मध्ये प्रत्येक संघात नवीन चेहरे दिसतील. 2018साली झालेल्या लिलावात प्रत्येक संघाला पाच खेळाडू कायम राखण्याची मुभा दिली होती. पण, यंदा त्यापेक्षा अधिक खेळाडू कायम राखण्याची संधी देण्याची शक्यता आहे. 14 नोव्हेंबरला ट्रेडिंग विंडो बंद होणार आहे.
प्रत्येक संघाला नवीन संघबांधणीसाठी 85 कोटी रुपये खर्च करण्याची मुभा दिलेली आहे. त्यात यंदा 3 कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक 8.2 कोटी रक्कम शिल्लक आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स ( 7.15 कोटी), कोलकाता नाइट रायडर्स ( 6.05 कोटी), सनरायझर्स हैदराबाद ( 5.3 कोटी), किंग्स इलेव्हन पंजाब ( 3.7 कोटी), चेन्नई सुपर किंग्स ( 3.2 कोटी), गतविजेता मुंबई इंडियन्स ( 3.05 कोटी) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( 1.8 कोटी) यांच्याकडे रक्कम शिल्लक आहेत.
Web Title: IPL 2020 Auction to take place on December 19 in Kolkata
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.