IPL 2020 : नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का 

IPL 2020 : भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 03:15 PM2020-08-29T15:15:26+5:302020-08-29T15:19:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : BCCI confirms 13 positive tests, including two cricketers, in the first week of IPL in UAE  | IPL 2020 : नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का 

IPL 2020 : नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देचेन्नई सुपर किंग्सचे दोन खेळाडूंसह अनेक स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्हबीसीसीआयनं शनिवारी केले अधिकृत आकडे जाहीर

भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सर्व फ्रँचायझी आपापल्या खेळाडूंसह दुबईत दाखल झाले. बीसीसीआयच्या नियमानुसार सर्व खेळाडू 6 दिवसांसाठी क्वारंटाईन झाले. पण, त्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी केली गेली आणि त्यात धक्कादायक बाब समोर आली. चेन्नई सुपर किंग्सच्या दोन खेळाडूंसह स्टाफमधील अनेकांना कोरोना झाल्याचे वृत्त दोन दिवस चर्चेत राहिले. पण, याबाबत बीसीसीआय किंवा आयपीएलकडून कोणतीच अधिकृत माहिती आली नव्हती. अखेर बीसीसीआयनं शनिवारी कोरोन पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा जाहीर केला.

IPL 2020 : कुटुंबीयांसोबत असताना आम्ही 'मास्क' घालत नाही; कोरोना पॉझिटिव्ह दीपक चहरचं ट्विट व्हायरल

बीसीसीआयनं शनिवारी ट्विट केलं की,''आयपीएलच्या 13व्या मोसमासाठी खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व नियमांचे काटेकोर पालन केलं जात आहे. संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाल्यानंतर आम्ही खेळाडूंची कोरोना चाचणी केली आणि त्यांना क्वारंटाईन राहण्यास सांगितले. 20 ते 28 ऑगस्ट या कालावधीत आम्ही 1988 कोरोना चाचणी केल्या. त्यात खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापक, बीसीसीआय स्टाफ, आयपीएल ऑपरेशनल टीम, हॉटेल व ग्राऊंड ट्रान्सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे.''

45 हजारांचा ड्रेस अन् जंगी पार्टी; विराट-अनुष्कानं दुबईत केक कापून साजरा केला आनंद!

''यात दोन खेळाडूंसह आतापर्यंत 13 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सदस्यांना आयसोलेट केले गेले आहे. आयपीएलच्या वैद्यकीय टीमकडून त्यांची तपासणी केली जात आहे. आयपीएलच्या नियमानुसार सातत्यानं सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे,''असेही बीसीसीआयनं स्पष्ट केलं.  


 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स संघातील पुणेकर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह 

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; सुरेश रैनानं घेतली माघार, मायदेशी परतला

IPL 2020 : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह गोलंदाज कोण ते समजलं; सुरेश रैनासह आलेला इतरांच्या संपर्कात 

IPL 2020 : विमानतळावरील 'झप्पी' CSKच्या खेळाडूंना महागात पडली? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Web Title: IPL 2020 : BCCI confirms 13 positive tests, including two cricketers, in the first week of IPL in UAE 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.