कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पण, देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा आयपीएल होईल, अशी आशा चाहत्यांनी सोडली आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) अजूनही आशावादी आहेत आणि ते वारंवार परदेशातील क्रिकेट मंडळांशी चर्चा करत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या तारखेनंतर देशातील परिस्थिती कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयपीएल फ्रँचायझी मालकांना परिस्थिती सुधरेल अशी अपेक्षा आहे. पण, त्याहीनंतर परदेशी खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहेच. त्यामुळे बीसीसीआय अन्य क्रिकेट संघटना म्हणजेच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आदींशी वारंवार संपर्कात आहेत. त्यांना देशातील कोरोना परिस्थितीबद्दल आणि केंद्र सरकारच्या पुढील पावलाबद्दल बीसीसीआय परदेशातील संघटनांना अपडेट्स देत आहेत.
'' आयपीएल्या 13व्या मोसमासंदर्भात अनेक मुद्यांवर चर्चा केली गेली. त्यात प्रामुख्यानं ही स्पर्धा बंद दरवाजात खेळवण्यावर विचार केला गेला. या लीगमध्ये परदेशी खेळाडू सर्वांना हवे आहेत,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं आयएएनएसला सांगितले. त्यामुळे परदेशातील क्रिकेट मंडळाशी बीसीसीआय सातत्यानं संपर्कात आहे आणि येथील परिस्थितीचा आढावा त्यांना दिला जातोय
त्यांनी पुढे सांगितले की,''परदेशातील सीमाही लॉकडाऊन केल्या गेल्या आहेत आणि ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. त्यामुळे जेव्हा आयपीएल होईल, तेव्हा परदेशी खेळाडूंना येथे येण्यासाठी विमानसेवा सुरू असणे गरजेचे आहे.'' परिस्थिती सुधारल्यास नव्या वेळापत्रकानुसार आणि फॉरमॅटनुसार आयपीएल खेळवली जाईल. अन्यथा ऑक्टोबर-नोव्हेंबरचा विचार सुरू आहे, परंतु त्यासाठी आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलते का, हेही पाहावे लागेल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
बाप रे बाप... फॉर्म्युला वनचा माजी बॉस 89 वर्षी बनला बाप; पत्नी आहे वयानं लहान
Big Breaking : कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय
Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न?
इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा मनाचा मोठेपणा; पगारातून केली कोट्यवधींची मदत
Shocking : कोरोना व्हायरसमुळे खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू
Ms Dhoniच्या हेअर स्टायलिस्टची नोकरी धोक्यात; Video पाहून कळेल खरं कारण