IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल २०२०) मध्ये बीसीसीआयने cost-cutting करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर बीसीसीआयने संघांच्या बक्षीस रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयनं आयपीएलमधील संघमालकांना पाठवलेल्या सर्क्युलरमध्ये याचा उल्लेख केला आहे. बीसीसीआयनं पाठवलेल्या सर्क्युलरमध्ये आयपीएल विजेत्या संघाला 20 एवजी यंदा 10 कोटीच बक्षीस रक्कम मिळणार आहे.
Video : धोनीला पाहताच गळ्यात पडला सुरेश रैना, मानेवर केलं Kiss
''आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यंदा विजेत्या संघाला 10 कोटी बक्षीस म्हणून मिळतील. 2019च्या विजेत्या संघाला 20 कोटी देण्यात आले होते. उपविजेत्या संघाला 12.5 कोटी ऐवजी 6.25 कोटी देण्यात येणार आहेत,'' अशी माहिती बीसीसीआयनं पीटीआयला दिली. क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी 4.375 कोटी रुपये मिळणार आहेत.
''आयपीएलवर आर्थिक मंदीचं सावट नाही. फ्रँचायझींचीही आर्थिक परिस्थिती चांगली आहे. प्रायोजकसह अन्य मार्गातून ते कमवत आहेत. तरीही बक्षीस रकमेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,''असेही बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले. राज्य संघटनांना आयपीएलच्या सामन्यांच्या आयोजनासाठी फ्रँचायझी आणि बीसीसीआयकडून प्रत्येकी 50 लाख असे 1 कोटी मिळणार आहेत.
बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना आता बिझनेस क्लासमधून विमान प्रवास करता येणार नाही. त्याशिवाय स्पर्धेच्या मध्यंतरानंतर होणाऱ्या खेळाडूंच्या अदलाबदलीच्या नियमातही बदल केला गेला आहे. यापूर्वी केवळ अनकॅप म्हणजे आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडूची संघ अदलाबदली करत होते. आता आंतरराष्ट्रीय आणि परदेशी खेळाडूंचीही अदलाबदली करता येऊ शकते.
''एखाद्या संघाकडून अंतिम अकरामध्ये दोन किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूची अदलाबदली होणार आहे. 28व्या सामन्यानंतर ही अदलाबदली करता येणार आहे. तोपर्यंत प्रत्येक संघ 7 सामने खेळलेला असेल,'' असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
विश्वचषकानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या धोनीचे चाहत्यांनी केले जोरदार स्वागत, व्हिडीओ वायरल