इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या चार संघांच्या बक्षीस रकमेत ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली. आयपीएलचा हा निर्णय फ्रँचायझी मालकांना काही पटलेला नाही. त्यामुळे त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी फ्रँचायझी मालकांनी स्वाक्षरी करून एक पत्र बीसीसीआयला मेल केले. पण, त्यांच्या या मेलला बीसीसीआय केराची टोपली दाखवण्याची शक्यता अधिक आहे.
फ्रँचायझी मालकांचे बंड? शाहरुख खान, अंबानीसह सर्वांचा 'त्या' निर्णयाला विरोध
आयपीएलमधील यंदा विजेत्या संघाला १० कोटी बक्षीस म्हणून मिळतील. २०१९च्या विजेत्या संघाला २० कोटी देण्यात आले होते. उपविजेत्या संघाला १२.५ कोटी ऐवजी ६.२५ कोटी देण्यात येणार आहेत. क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी ४.३७ कोटी रुपये मिळणार आहेत. प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या चार संघांमध्ये ५० कोटी बक्षीस रक्कम विभागली जाते. २०१४च्या मोसमापासून फ्रँचायझी मालकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून बीसीसीआयनं बक्षीस रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता फ्रँचायझींना स्पॉन्सरशीप, प्रायोजक आदींमधून अनेक महसूल कमवत आहेत. त्यामुळे बक्षीस रक्कम करारानुसारच देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.
''2013मध्ये आयपीएलमधून हवा तसा आर्थिक फायदा मिळन नसल्याचे फ्रँचायझींनी सांगितले होते. तेव्हा त्यांनी आमच्याकडे मदत मागितली होती. तेव्हा खेळाडूंच्या पगाराचा मुद्दा उपस्थित होऊ नये, यासाठी बीसीसीआयनं मदत करण्याचा निर्णय घेतला. आता फ्रँचायझींना मोठा फायदा होत आहे. त्यामुळे बक्षीस रक्कम कमी करण्यात आली आहे,'' असे आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी आधीच सांगितले होते.
''आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत फ्रँचाझींच्या मतावर चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, परंतु आम्ही घेतलेल्या निर्णयात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे,'' असे पटेल यांनी 'हिंदुस्तान टाईम्स' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग, हार्दिक-नताशा रंगले प्रेमाच्या रंगात!
Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत
Mumbai Indiansच्या अष्टपैलू खेळाडूला दुखापत, ट्वेंटी-२० लीगमधून माघार
WADAला धक्का; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला द्यावी लागली साडेतीन कोटींची भरपाई
विराट कोहली 'क्रिकेटच्या देवा'चा आणखी एक विक्रम मोडणार, आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचणार
Web Title: IPL 2020 : BCCI unlikely to roll back slashed playoff fund, says IPL chief svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.