मुंबई : आयपीएलमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्रवीण तांबेला बीसीसीआयकडून मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता प्रवीण आयपीएल खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना प्रवीणने आपली ओळख निर्माण केली होती. यंदा कोलकाता नाइट रायडर्स संघाने २० लाख रुपये मोजून प्रवीणला आपल्या संघात स्थान दिले होते. पण आता प्रवीण यंदाची आयपीएल खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
प्रवीण ४८ वर्षांचा आहे. त्यामुळे प्रवीणला वयाचे बंधन नाही, असे म्हटले जात आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये प्रवीण टी-१० लीग खेळला होता. अबुधाबी आणि शारजा येथे झालेल्या या लीगमध्ये प्रवीणने हॅट्ट्रिक घेतली होती. त्यामुळे प्रवीणच्या वयाचा त्याच्या कामगिरीवर कोणताही परीणाम झालेला पाहायला मिळालेला दिसत नाही.
बीसीसीआयचे काही नियम आहेत. त्यानुसार करारबद्ध खेळाडूंनी फक्त आयपीएल या लीगमध्येच खेळावे, असा नियम आहे. त्यामुळे जर आता प्रवीण टी-१० लीगमध्ये खेळला असेल तर त्याला आयपीएलमध्ये खेळता येऊ शकत नाही. त्यामुळे प्रवीणच्या कारकिर्दीला मोठा धक्का लागू शकतो, असे म्हटले जात आहे.