Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) धक्के बसण्यास सुरू झाली. सुरेश रैना ( Suresh Raina) आणि हरभजन सिंग ( Harbhajan Singh) या अनुभवी खेळाडूंनी IPL 2020तून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्यात दीपक चहर ( Deepak Chahar) आणि ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) यांना कोरोना झाला आणि त्यातून ते बरेही झाले. या संकटावर मात करत त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्धचा ( Mumbai Indians) सलामीचा सामना जिंकला. त्यातही प्रमुख अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होची उणीव जाणवली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ( Rajasthan Royals) सामन्यातही ब्राव्हो खेळला नव्हता. आता CSKचा आणखी एक मॅच विनर खेळाडू पुढील दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( Live Score & Updates )
Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका
महेंद्रसिंग धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय? त्याने जे केलं त्याचं समर्थन करावं का?
RR विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. RRने निर्धारित षटकात 7 बाद 216 धावा चोपल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( Shane Watson) 33 धावा करून माघारी परतला. फॅफ डू प्लेसिसनं ( Faf du Plessis) 37 चेंडूंत 72 धावा चोपल्या. त्यात 1 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. धोनीने अखेरच्या षटकात काही उत्तुंग फटके मारले, परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. CSKने 6 बाद 200 धावा केल्या. RRने 16 धावांनी हा सामना जिंकला. धोनीनं 17 चेंडूंत 3 षटकारांसह नाबाद 29 धावा केल्या. ( Live Score & Updates )
IPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही!
सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, मिचेल मार्शची IPL2020तून माघार; विंडीजचा स्टार खेळाडू दाखल
RRविरुद्धच्या सामन्यात CSKला मधल्या फळीत अंबाती रायुडूची ( Ambati Rayudu) उणीव प्रकर्षाने जाणवली. MIविरुद्धच्या सामन्यात रायुडूनं मॅचविनिंग खेळी केली होती. त्यानं Opening Matchमध्ये 48 चेंडूंत 71 धावांची फटकेबाजी केली. पण, RRविरुद्ध त्याला खेळता आले नाही. तो 100 टक्के तंदुरुस्त नसल्याचे सांगत MS Dhoniनं ऋतुराज गायकवाडला अंतिम 11त संधी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार रायुडू आणखी दोन सामन्यांना तरी मुकेल, असे वृत्त समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना 25 सप्टेंबरला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्ध होणार आहे आणि त्यानंतर 2 ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाशी ते भिडतील. ( Live Score & Updates )
CSKच्या CEO कासी विश्वनाथन यांनी सांगितले की,''चिंता करण्याचं कारण नाही. त्याला हॅमस्ट्रींगची थोडीशी समस्या आहे. तो आणखी एक सामना खेळू शकत नाही, परंतु उद्या आम्ही त्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ. तो तंदुरुस्त होईल.'' ( Live Score & Updates )
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं
संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video
महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six
महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी
Hard Luck!, CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनानं केलेलं ट्विट व्हायरल