मुंबई : सलामीलाच कट्टर मुंबई इंडियन्सला नमवून यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) स्पर्धेची दणक्यात सुरुवात केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला (Chennai Super Kings) आपल्या दुसऱ्या सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) तुफानी फटकेबाजीत चेन्नईच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई झाली. मुंबईविरुद्ध संघाला विजयी करणारा फलंदाज अंबाती रायुडू दुखापतीमुळे राजस्थानविरुद्ध खेळला नव्हता आणि त्याची अनुपस्थिती चेन्नईला प्रकर्षाने जाणवली. मात्र आता रायुडू दुखापतीतून अद्याप सावरलेला नसल्याने तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने चेन्नईच्या तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Live Score & Updates )
IPL 2020 : दिल्लीचा ‘हा’ वेगवान गोलंदाज अजूनही संघाबाहेरच राहणार
राजस्थानविरुद्ध फलंदाजांकडून झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे चेन्नईला रायुडूची उणीव भासली. परंतु, आता चेन्नईला आणखी एक सामना त्याच्याविना खेळावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने आता रायुडू संघाबाहेर राहणार असल्याची माहिती दिली आहे.
सीएसकेचे सीईओने रायुडूचे दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘रायुडूला हेमस्ट्रिंग इंज्युरी झाली आहे आणि आता आणखी एक सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या एका सामन्यानंतर मात्र रायुडू खेळण्यास सज्ज होईल.’ सीएसके दिल्लीविरुद्ध 25 सप्टेंबरला खेळणार आहे आणि या सामन्याआधी चेन्नईला विश्रांतीसाठी मोठा कालावधी मिळाला आहे. मात्र असे असले तरी रायुडू मात्र या सामन्यात खेळणार नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर एक आठवड्याच्या अंतराने चेन्नई सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानावर उतरेल.
अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर रायुडूकडे चेन्नईच्या मधल्या फळीची मोठी जबाबदारी आली होती. पहिल्याच सामन्यात त्याने विजयी खेळी करताना संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वासही सार्थ ठरविला होता.
Web Title: IPL 2020 big blow for CSK Ambati Rayudu Will Miss One More Game
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.