IPL 2020: "आता कुठेही जाणार नाही, 2020 घरातच"; कोरोना टेस्ट निगेटिव्ह तरीही ख्रिस गेलचे वेगळे 'संकेत'

IPL 2020: उसेनचा 21 ऑगस्टला वाढदिवस होता. बोल्टने पार्टीनंतर कोरेनाची चाचणी केली, यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे, धक्कादायक म्हणजे या पार्टीची धग आता आयपीएललाही बसणार असून क्रिकेटर ख्रिस गेल (Chris Gayle) या पार्टीला हजर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 11:59 AM2020-08-25T11:59:54+5:302020-08-25T12:23:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Big blow to Kings XI?; Chris Gayle's Corona test negative but says sorry | IPL 2020: "आता कुठेही जाणार नाही, 2020 घरातच"; कोरोना टेस्ट निगेटिव्ह तरीही ख्रिस गेलचे वेगळे 'संकेत'

IPL 2020: "आता कुठेही जाणार नाही, 2020 घरातच"; कोरोना टेस्ट निगेटिव्ह तरीही ख्रिस गेलचे वेगळे 'संकेत'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेगाचा बादशाह आणि जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत मौजमस्ती करणारा किंग्स इलेव्हन पंजाबचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल अडचणीत आला होता. आज गेलची पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये तो निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. (Chris Gayle Covid-19 test Negative)


उसेनचा 21 ऑगस्टला वाढदिवस होता. बोल्टने पार्टीनंतर कोरोनाची चाचणी केली, यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे, धक्कादायक म्हणजे या पार्टीची धग आता आयपीएललाही बसणार असून क्रिकेटर ख्रिस गेल (Chris Gayle) या पार्टीला हजर होता. उसेन बोल्टच्या पार्टीला फुटबॉलर रहीम स्टर्लिंग आणि लियॉन बैली देखील आले होते. याशिवाय अन्य बड्या हस्तीदेखील उपस्थित होत्या. बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बोल्ट याच्या 34 व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर कमालीचे व्हायरल झाले होते. या पार्टीमध्ये आलेले पाहुणे सोशल डिस्टंसिंग सोडा मास्क न लावता नाचत-गात होते. बोल्टने पार्टीनंतर 'बेस्ट बर्थडे एव्हर' असे ट्वीटही केले होते. 


बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गेलने कॅरेबिअन प्रीमियर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयपीएलमध्ये गेल किंग्स इलेव्हन पंजाबचा महत्वाचा खेळाडू आहे. यामुळे कोरोनामुळे त्याच्या संघातील समावेश किंवा स्पर्धेतील खेळण्यावर प्रश्नचिन्ह लागले होते. गेलची पहिली चाचणी निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला असून गेलची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. 


कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर गेलनेच याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली आहे. मला पुढील प्रवासासाठी दोन टेस्ट निगेटिव्ह याव्या लागणार आहेत. 


यानंतर त्याने मी आता 2020साठी घरीच राहणार आहे. कुठेही प्रवास करणार नाही. माफ करा, असे म्हटले आहे. यामुळे गेल यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी दिसत आहे. इन्स्टावर त्याने याचे फोटो टाकले होते. गेलचा इतिहास पाहता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊनही पुन्हा मैदानावर उतरलेला आहे. यामुळे सध्यातरी त्याचे आयपीएलमध्ये खेळणे तळ्यात मळ्यातच असल्याने किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ मात्र गॅसवर आहे.

 
जमैकामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1412 रुग्ण सापडले आहेत. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 14 दिवसांत 410 रुग्ण सापडले होते. यामुळे जमैकामध्ये कोरोना पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?

IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत

Sushant Singh Rajput case: सुशांतच्या हत्येमागे दोन 'डॅडी'; जिम पार्टनर मित्राचा खळबळजनक आरोप

Video: अंतराळात खळबळ उडाली! पृथ्वीवर एकाचवेळी पाच UFO दिसले; रशियाने टिपले

IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला

किम जोंग उन कोमात, बहीण उत्तर कोरियाची सत्ताधारी; माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी

Read in English

Web Title: IPL 2020: Big blow to Kings XI?; Chris Gayle's Corona test negative but says sorry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.