IPL 2020: पंजाब ठरणार 'किंग'; जाणून घ्या लिलावासाठी कोणाचा किती बजेट! 

IPL Auction 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२० च्या मोसमासाठीचे ट्रेड विंडो ( अदलाबदली ) आज बंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 07:18 PM2019-11-15T19:18:27+5:302019-11-15T19:23:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 :  Budget available to the eight teams for the IPL 2020 Auction | IPL 2020: पंजाब ठरणार 'किंग'; जाणून घ्या लिलावासाठी कोणाचा किती बजेट! 

IPL 2020: पंजाब ठरणार 'किंग'; जाणून घ्या लिलावासाठी कोणाचा किती बजेट! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२० च्या मोसमासाठीचे ट्रेड विंडो ( अदलाबदली ) आज बंद झाली. सर्व संघानी आपापल्या संघांतून काही खेळाडूंना रिलीज केले आणि या करारमुक्त झालेल्या खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. प्रत्येक संघांनी यशस्वी रणनीती आखून संघातील नावाजलेल्या आणि महागड्या खेळाडूंना डच्चू देत सर्वांना आश्चर्यचकित केले. या खेळाडूंना मुक्त करून संघाने लिलावासाठीचा आपला बजेट वाढवला. त्यात यंदा प्रत्येक संघाला आपल्याकडील ३ कोटी बजेट मध्ये जमा करण्याची मुभा दिल्यानं लिलावात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. 

किंग्स इलेव्हन पंजाबने डेव्हिड मिलर, ॲंड्र्यू टे, सॅम कुरन, वरून चक्रवर्ती या खेळाडूंना रिलीज केले आहे.

 

ट्रेड विंडो बंद झाल्यानंतर कोणाकडे किती रुपये राहिले ते पाहूया.. 

चेन्नई सुपर किंग - १४.६ कोटी
दिल्ली कॅपिटल्स - २७. ८५ कोटी
किंग्ज इलेव्हन पंजाब - ४२.७ कोटी
कोलकाता नाइट रायडर्स - ३५.६५ कोटी
राजस्थान रॉयल्स - २८.९ कोटी
मुंबई इंडियन्स- १३.०५ कोटी 
सनरायझर्स हैदराबाद - १७ कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७.९ कोटी

Web Title: IPL 2020 :  Budget available to the eight teams for the IPL 2020 Auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.