Indian Premier League ( IPL 2020) 13व्या पर्वाला सुरुवात होऊन आता एक आठवडा झाला. कोरोना व्हायरसमुळे यंदाची IPL ही भारताबाहेर UAEत खेळवण्यात येत आहे. कोरोनामुळे IPLमधील प्रत्येक फ्रँचायझींना BCCIनं ठरवलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागत आहे. प्रेक्षकांविना खेळाडूंना सामना खेळावा लागत आहे आणि ती उणीव भरून काढण्यासाठी प्रेक्षकांचा रिकॉर्डेड आवाज सामन्यादरम्यान वाजवला जात आहे. या दरम्यान IPL Trophy रोज स्टेडियमवर कशी आणली जाते, हे तुम्हाला माहित्येय का? RR vs KXIP Latest News & Live Score
शारजात आज कुणाचं वादळ घोंघावणार? जोस बटलर, ख्रिस गेल आज खेळणार?
Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला काल एक आठवडा पूर्ण झाला. 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं IPL 2020चा श्रीगणेशा झाला. गतविजेत्या MIला सलामीच्या सामन्यात हार पत्करावी लागली, परंतु त्यानंतर त्यांनी दमदार कमबॅक केले. पण, विजयानं सुरुवात करणाऱ्या CSKची गाडी मात्र पुढील दोन सामन्यांत रुळावरून घसरली. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघानं अनपेक्षित कामगिरी करताना गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. किंग्स इलेव्हन पंजाबचा ( Kings XI Punjab) कर्णधार लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक हे पहिल्या आठवड्यातील कौतुकास पात्र खेळी ठरली. RR vs KXIP Latest News & Live Score
सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य
मिचेल स्टार्कच्या पत्नीनं मोडला MS Dhoniचा रेकॉर्ड; जगात पटकावलं अव्वल स्थान
IPL 2020च्या प्रत्येक सामन्यात स्टेडियमवर ट्रॉफी आणली जाते. ही आयपीएलची ट्रॉफी IPL 2020 Central Sponsor Tata ALTROZ या गाडीतून प्रत्येक स्टेडियमवर आणली जाते. IPLच्या ट्रॉफीवर संस्कृतमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते म्हणजे जिथे गुणवत्तेला संधी मिळते... (Where talent meets opportunity) असे लिहिले आहे.
पाहा खास व्हिडीओ..