Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) बाबतीत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. IPLच्या इतिहातास आतापर्यंत जे घडले नव्हते ते महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघासोबत घडले. IPL च्या प्रत्येक पर्वात Play Off पर्यंत मजल मारणाऱ्या CSKला प्रथमच अपयश पचवावे लागले. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि CSK या दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. धोनीच्या संघातील महारथींनी आज पाट्या टाकल्या. चेन्नई सुपर किंग्सच्या या कामगिरीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानं नाराजी व्यक्त केली. चेन्नई एक्स्प्रेस आता मालगाडी झाली आहे, अशी टीका त्यानं केली. चेन्नई सुपर किंग्स बनले परावलंबी!; IPL 2020 Play Off चं चौथं तिकीट कोण अन् कसं पटकावणार?
चेन्नई सुपर किंग्सला या पराभवानंतर १० सामन्यांत ७ पराभवासह तळाला समाधान मानावे लागले आहे. आजच्या निकालानं त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतूनही जवळपास बाहेर फेकले आहे. राजस्थान रॉयल्सनं १० सामन्यांत ४ विजयासह ८ गुणांची कमाई करत आव्हान कायम राखले आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्या दोघांना धावा घेताना चाचपडावे लागले. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १२५ धावा करता आल्या. चेन्नई सुपर किंग्स करणार मेकओव्हर; IPL 2021 Auctionमध्ये 'या' खेळाडूंना करणार रिलीज!
आकाश चोप्रानं टीका केली की,''चेन्नई एक्स्प्रेस आता मालगाडी झाली आहे. त्यांचा खेळ अत्यंत संथ झाला आणि त्यांना सातवा पराभव पत्करावा लागला. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना होता. आता केवळ चार सामने शिल्लक आहेत आणि ते सर्वच्या सर्व जिंकूनही तुमच्या खात्यात १४ गुणच जमा होतील.''