इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) 13वा मोसम तोंडावर असताना चेन्नई सुपर किंग्सला धक्के बसले आहेत. त्यांचे दोन खेळाडूंसह 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यात संघाचा उपकर्णधार सुरेश रैनानं वैयक्तीक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आणि तो मायदेशात परतला. त्यामुळे आता संघासमोर मोठं आव्हान आहे. पण, सुरेश रैनानं माघार घेतल्यानं यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सच्या संघात आणखी एका मराठमोळ्या खेळाडूला संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
गोलंदाज दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. त्यांच्याशिवाय सीएसकेच्या सपोर्ट स्टाफमधीलही काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. बीसीसीआयनं शनिवारी ट्विट केलं की,'' संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाल्यानंतर आम्ही खेळाडूंची कोरोना चाचणी केली आणि त्यांना क्वारंटाईन राहण्यास सांगितले. 20 ते 28 ऑगस्ट या कालावधीत आम्ही 1988 कोरोना चाचणी केल्या. त्यात खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापक, बीसीसीआय स्टाफ, आयपीएल ऑपरेशनल टीम, हॉटेल व ग्राऊंड ट्रान्सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे. यात दोन खेळाडूंसह आतापर्यंत 13 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.''
रैनाच्या माघारीनंतर सीएसकेचा प्लेईंग इलेव्हन कसा असेल याची चर्चा सुरू झाली आहे. सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांनी 23 वर्षीय ऋतुराज गायकवाड याला संधी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. ऋतुराजच्या फलंदाजीवर कर्णधार महेंद्रसिंग धोनीही खुश आहे. सध्या ऋतुराज क्वारंटाईन झाला आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. ऋतुराजला संधी मिळाल्यास केदार जाधवसह सीएसकेचे प्रतिनिधित्व करणारा तो महाराष्ट्राचा दुसरा फलंदाज ठरेल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video: ट्वेंटी-20त 195 धावा करूनही पाकिस्तान पराभूत; इंग्लंडनं बदड बदड बदडले!
कोट्याधीश महेंद्रसिंग धोनीकडे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे 1,800 रुपये थकीत!
हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप
किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!
असा असेल प्लेईंग इलेव्हनफॅफ ड्यु प्लेसिस/शेन वॉटसन, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, दीपक चहर, लुंगी एनगिडी/जोश हेझलवूड, हरभजन सिंग, इम्रान ताहीर.
ऋतुराजची कामगिरी
गायकवाडनं 2016-17च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघाकडून पदार्पण केलं. त्याच वर्षी त्यानं आतंरराज्य ट्वेंटी-20 स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं. ऑक्टोबर 2018मध्ये त्याला भारत ब संघाकडून देवधर ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर ACC एमर्जिंग टीम आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. डिसेंबर 2018मध्ये चेन्नई सुपर किंग्सनं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यातील सामन्यात त्यानं नाबाद 187 धावा चोपल्या होत्या. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19 सामन्यांत 1193 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20त त्यानं 28 सान्यांत 843 धावा चोपल्या आहेत. नाबाद 82 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.