ख्रिस गेलच्या ( Chris Gayle) फटकेबाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्ससमोर ( Rajasthan Royals) तगडं आव्हान उभं केलं. पण, बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि RRच्या सर्व फलंदाजांनी सांघिक खेळ करताना संघाचा विजय पक्का केला. KXIPची विजयी घोडदौड रोखून RRनं स्वतःचं स्पर्धेतील आव्हान कायम राखले. या पराभवाबरोबच KXIPला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा स्फोटक फलंदाज गेलनं रागाच्या भरात केलेलं कृत्य त्याला महागात पडले आहे.
राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. राहुलनं ४१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार मारून ४६ धावा केल्या. गेल ६३ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकार मारून ९९ धावांवर माघारी परतला. पंजाबनं २० षटकांत ४ बाद १८५ धावा चोपल्या. गेलचं शतक अवघ्या एका धावेनं हुकल्यानं त्याच्या चाहत्यांना दुःख नक्की वाटलं असेल. तसे ते गेललाही वाटलं आणि ९९ धावांवर त्रिफळाचीत झाल्यानंतर त्यानं रागात बॅटच फेकली. त्याची ही कृती IPLचे २.२ नियम मोडणारे ठरले आणि त्याला मॅच फीमधील १० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
पाहा व्हिडीओ...
प्रत्युत्तरात बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) राजस्थान रॉयल्सला वादळी सुरुवात करून दिली. स्टोक्सनं पहिल्या विकेटसाठी रॉबीन उथप्पासह ६० धावांची भागीदारी केली. त्यात स्टोक्सच्या ५० धावा होत्या. त्यानं २६ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचले. ख्रिस जॉर्डननं KXIPला यश मिळवून दिले. उथप्पा व संजू सॅमसन यांनीही दुसऱ्या विकेटसाठई ५१ धावा जोडल्या. मुरुगन अश्वीनला लागोपाठ दोन षटकार खेचण्याच्या प्रयत्नात उथप्पा ( ३०) माघारी परतला. सॅमसन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथनं त्यानंतर संयमी खेळ केला, परंतु १५व्या षटकात सॅमसन धावबाद झाला.
सूचिथच्या डायरेक्ट हिटवर सॅमसन ४८ धावांवर ( २५ चेंडू, ४ चौकार व ३ षटकार) बाद झाला. जोस बटलर आणि स्मिथ यांनी मोहम्मद शमीनं टाकलेल्या १७व्या षटकात १९ धावा चोपून सामना राजस्थानच्या पारड्यात अलगद झुकवला.बटलर ११ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २२, तर स्मिथ २० चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं ३१ धावांवर नाबाद राहिला. राजस्थाननं १७.३ षटकांत ३ बाद १८६ धावा करून विजय पक्का केला.
Web Title: IPL 2020 : Chris Gayle has been fined 10 percent of his match-fee for breaching the IPL Code of Conduct during match KXIP vs RR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.