पुणे - यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अगदीच सुमार होत आहे. मुंबईला सलग पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, संघाच्या सलग पाच सामन्यात झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मबाबत सूचक विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, मी आयपीएल २०२२ मध्ये कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मबाबत फारसा चिंतीत नाही आहे. कारण एका मोठ्या खेळीनंतर सारे काही सुरळीत होऊन जाईल. मात्र संघाला त्याच्या या खेळीची प्रतीक्षा आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला काही डावांत चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याचं मोठ्या खेळीत रूपांतर करणे त्याला जमलेलं नाही. त्याने आतापर्यंत २१.६०च्या सरासरीने केवळ १०८ धावाच जमवता आल्या. महेला जयवर्धने यांनी सांगितले की, जर तुम्ही त्याच्या डावाची सुरुवात करण्याच्या पद्धतीकडे पाहिले तर तो ज्याप्रकारे फटके मारत आहे ते खूप जबरदस्त आहे. तो चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग करत आहे. त्याला खूप चांगली सुरुवात मिळत आहे. मात्र या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करणे जमत नसल्याने तो निराश आहे.
आम्ही रोहित शर्माला १४-१५ षटकांपर्यंत फलंदाजी करताना आणि मोठी खेळी करताना पाहिले आहे. तो खूप जबरदस्त खेळाडू आहे. तसेच त्या्चया फॉर्मबाबत मी खूप काही चिंतीत नाही आहे, असे महेला जयवर्धने याने सांगितले. मुंबई इंडियन्सला बुधवारी पंजाब किंग्सकडून १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. हा त्यांचाय सलग पाचवा पराभव होता. त्यामुळे संघ क्वलिफायरच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.