रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील एकतर्फी वाटत असलेला सामन्यात युजवेंद्र चहलनं ट्विस्ट आणला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) खेळपट्टीवर असेपर्यंत सामना SRHच्या मुठीत होता, पण युजवेंद्रच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामन्याचे चित्रच बदलले. या विजयानंतर विराट कोहली ( Virat Kohli) & Teamने ड्रेसिंग रुममध्ये केलंलं सेलिब्रेशन पाहा. ( Live Score & Updates )
IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा
OMG : KKRच्या फलंदाजाची तुफान फटकेबाजी, कॅमेराची काचच फोडली; MIला धोक्याचा इशारा, Video
Munde baaro **** , लोकेश राहुलने वापरले अपशब्द; सोशल मीडियावर Video Viral
RCBकडून आयच्या सामन्यात IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडीक्कलनं ( Devdutt Padikkal) दमदार बॅटींग केली. देवदत्तनं ( Padikkal) आरोन फिंच ( Aaron Finch) सारख्या अनुभवी फलंदाजासह RCBला दमदार सुरुवात करून दिली. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं 56 धावा केल्या. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) याने दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा उभारता आल्या. ( Live Score & Updates )
लक्ष्याचा पाठलाग करताना SRHची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचा कर्णधार व फॉर्मात असलेला फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुर्दैवीरित्या धावबाद झाला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी RCBच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. SRH हा सामना जिंकतील असे सहज वाटत होते. बेअरस्टो आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावा जोडल्या. युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामना फिरवला. चहलनं ही जोडी तोडताना पांडेला ( 34) धावांवर बाद केले. बेअरस्टो 16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर चहलनं SRHच्या विजय शंकरला त्रिफळाचीत केले. ( Live Score & Updates )
SRHला नमवून विराट कोहलीचा विक्रम; महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांच्या मानाच्या पंक्तित जाऊन बसला!
तेथे सामना फिरला आणि शिवम दुबे व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर डेल स्टेननं एक विकेट घेत SRHचा डाव 19.4 षटकांत 153 धावांवर गुंडाळला. एकेकाळी 2 बाद 121 अशा मजबूत स्थितित असलेला SRHचा डाव 153 धावांवर गडगडला. त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 32 धावांत माघारी पाठवले. ( Live Score & Updates )
पाहा व्हिडीओ...
View this post on InstagramA post shared by Royal Challengers Bangalore (@royalchallengersbangalore) on